
सांगोला / प्रतिनिधी
सांगोला नगरपरिषद २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वेश झपके हे होम टू होम प्रचारावर भर देत आहेत.
सांगोला शहर आणि उपनगरातील वाड्या वस्तीवर जाऊन जनसामान्यांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत. त्यांच्या
या बैठकीसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मला निवडून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करून येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात नगरपालिकेच्या माध्यमातून सांगोला शहराच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणार असल्याचे विश्वेश झपके यांनी सांगितले. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार असणारे विश्वेश झपके यांच्या जनता भेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.काल त्यांनी सांगोला शहरातील प्रमुख बाजारपेठेतून व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्याच पद्धतीने सुतार वस्ती, खारवटवाडी, पाटील वस्ती, सावंत वस्ती दोन, भोकरे वस्ती, भोसले वस्ती आदी ठिकाणी जाऊन त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके उपस्थित होते.