सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा संस्कारक्षम संस्था पुरस्काराने आज होणार सन्मान

सांगोला / प्रतिनिधी
पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी यांच्या वतीने दिला जाणारा पद्मश्री नारायण सुर्वे संस्कारक्षम शिक्षण संस्था पुरस्कार यावर्षी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला या संस्थेस प्रदान करण्यात येत आहे
विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीबरोबरच विद्यार्थी संस्कारक्षम व्हावा यासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सातत्याने विविध प्रकारचे उपक्रम राबवित असते. सांगोला विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, सांगोला, विद्यामंदिर प्राथमिक विभाग, नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, प्राथमिक विभाग, कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज व प्राथमिक विभाग, विद्यामंदिर बालक मंदिर अशा विविध
शाखांमधून संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रमातून प्रयत्न केले जातात. त्यामुळे भविष्यात प्रत्येक विद्यार्थी अधिक उन्नत अधिक परिपूर्ण व जबाबदार नागरिक तयार करण्यात सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळातील सर्वच शाखां गुणवत्तेत अग्रेसर असून उज्वल निकालाची परंपरा सातत्याने ठेवली आहे. या सर्व बाबी प्रमाण मानून नारायण सुर्वे कला साहित्य व अकादमीच्या वतीने आज शनिवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे संस्कारक्षम संस्था पुरस्काराने सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळास सन्मानित करण्यात येत आहे.
हा पुरस्कार प्रदान सोहळा येथे पिंपरी येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस, पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कल्याणराव काळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कृष्णा इंगोले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांचा विचार व तत्व प्रमाण मानून संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष उपाध्यक्ष अँड विजयसिंह चव्हाण, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, संस्था कार्यकारिणी सदस्य शीलाकाकी झपके, विश्वेश झपके सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य, विद्यामंदिर परिवार प्रशासकीय अधिकारी शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक व रचनात्मक विकासासाठी होणाऱ्या उपक्रमाची दखल राज्यस्तरावर काम करणाऱ्या पद्मश्री विविध नारायण सुर्वे साहित्य व कला अकादमीच्या वतीने घेण्यात आली असून संस्थेत येऊन संस्थेच्या कार्याचा गौरव या पुरस्काराच्या रूपाने होतो आहे हे संपूर्ण सांगोला तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे.