माजी नगराध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वेश झपके यांची उमेदवारी धरत आहे जोर

सांगोला (प्रतिनिधी):-
नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार विश्वेश झपके यांच्या पाठिशी आता माजी नगराध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके ठामपणे उभे राहिल्याने निवडणुकीत नवे समीकरण निर्माण झाले आहे. माजी नगराध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी विश्वेश झपके यांची संपूर्ण निवडणूक जबाबदारी स्वीकारत गेल्या काही दिवसांपासून बैठका, नियोजनबद्ध संपर्क दौऱ्यावर मोठा जोर दिला आहे.
या बैठकींना नागरिकांकडून मिळत असलेला अनपेक्षित आणि उत्स्फूर्त प्रतिसाद विश्वेश झपके यांच्या उमेदवारीसाठी निर्णायक ठरत आहे. प्रभागनिहाय घेतल्या जाणाऱ्या चर्चामध्ये उपस्थिती वाढत असून, व्यापारी, महिला, युवक आणि ज्येष्ठ मतदार या सर्व स्तरांमधून समर्थनाचा ओघ वाढताना दिसत आहे.
माजी नगराध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या पूर्वीच्या कारभाराचा अनुभव, शहरातील विकासकामांची त्यांची जाण आणि नागरिकांशी असलेला थेट संवाद-या सर्वांचा थेट फायदा विश्वेश झपके यांना मिळत आहे.
स्थिर नेतृत्व, पारदर्शक कामकाज आणि स्वतंत्र उमेदवारी यामुळे मतदारांमध्ये अपक्ष पर्याय अधिक बळकट होत आहे. राजकीय पक्षांमध्ये उमेदवार निवडीचा गोंधळ सुरू असताना, माजी नगराध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या सक्रिय सहभागामुळे विश्वेश झपके यांच्या अपक्ष उमेदवारीला मोठी गती मिळाली आहे आणि नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत त्यांचे स्थान अधिक मजबूत होताना दिसत आहे.
नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून उभे असलेले विश्वेश झपके हे सांगोल्यात नवीन परंतु प्रभावी चेहरा म्हणून पुढे येत आहेत. त्यांच्या अभ्यासूपणामुळे, विकासाकडे पाहण्याच्या दूरदृष्टीमुळे आणि शांत स्वभावामुळे विविध समाजघटकांकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
माजी नगराध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके यांच्या मार्गदर्शनामुळे प्रचारात अधिक गांभीर्य आणि योजनाबद्धता आली आहे. झपके यांच्या व्यक्तिमत्वातील साधेपणा,लोकांशी जोडून घेण्याची क्षमता आणि विकासाबाबतची स्पष्ट दृष्टी यांनी त्यांच्या सभांना, भेटीगाठींना आणि घर दौऱ्यांना वाढता प्रतिसाद मिळतोय. व्यापारी, युवक, महिला व नवमतदार वर्ग श्री. विश्वेश झपके यांना पर्यायी, सक्षम व पारदर्शक नेतृत्वाचा पर्याय म्हणून पाहत असून, नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत त्यांची प्रतिमा व लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.