
सांगोला (प्रतिनिधी)
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला तर्फे सांगोला बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी बाक भेट देण्यात आले आहेत. सांगोला विद्यामंदिर प्रशाला ज्युनिअर
कॉलेजचे प्राचार्य अमोल गायकवाड यांच्या हस्ते सांगोला आगार व्यवस्थापक चंदनशिवे साहेब व तोंडे साहेब यांना सदर बाक देण्यात आले. यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते..