
सांगोला /प्रतिनिधी:
सांगोला नगरपालिका निवडणुक 2025 साठी शिवसेना शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्हावरती नगराध्यक्ष पदासहनगरसेवक पदाचे सर्व उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मोठ्या जिद्दीने शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडणुकीला सामोरे जाऊन मतदारांचा विश्वास संपादन करतील. सांगोला शहराच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षात 200 कोटी रुपये निधी आणला. शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावले. नगरपालिकेच्या या ऐतिहासिक निवडणूकीत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाचे 23 उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी पक्ष कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या उमेदवारांच्या बैठकी प्रसंगी व्यक्त केला.
या बैठकीसाठी नगराध्यक्ष पदासह 23 नगरसेवक पदाचे उमेदवार, युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख सागरदादा पाटील , पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसेना बापूप्रेमी ,युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, नगरपालिकेच्या स्थापनेपासून प्रथमच नगरपालिका निवडणुकीत शिवसेना पक्षाकडून धनुष्यबान या चिन्हावरती 24 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. नगरपालिका निवडणुकीचा हा ऐतिहासिक लढा आहे. सांगोला तालुक्यात सध्या स्वार्थी राजकारण सुरू आहे. तालुक्यात नगरपालिका निवडणुकीसाठी अभद्र युती झाली असून खर्या अर्थाने मतदार हा आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विचाराला मानणारा आहे. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवारांनी मतदारांना विश्वासात घेऊन आजपर्यंत केलेल्या विकास कामांची माहिती द्यावी. या निवडणुकीमध्ये सर्व समाजातील मतदारांचे आशीर्वाद उमेदवारांच्या पाठीशी राहणार आहेत. सांगोला नगरपालिकेवर शिवसेना शिंदे गटाची सत्ता येणार असून शिवसेनेचा भगवा झेंडा नगरपालिकेवर लागणार आहे. मतदारांनी विरोधकांच्या कोणत्याही आमिषाला व खोट्या अफवांना बळी न पडता आपल्या प्रचाराच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचावे. निवडणुकीला धाडसाने व जिद्दीने सामोरे जावा. या नगरपालिका निवडणुकीत विजयाचा गुलाल आपलाच आहे. असा विश्वास माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी उमेदवारांच्या बैठकी प्रसंगी व्यक्त केला.
यावेळी प्रस्ताविकात आनंद घोंगडे यांनी सर्व उमेदवारांना जागरूक राहण्याचे आवाहन केले. बापूंनी आजपर्यंत केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवून शहराच्या नवीन विकासासाठी मतदारांना सामोरे गेले पाहिजे.
यावेळी माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ म्हणाले, शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासहनगरसेवक पदाचे सर्वच अर्ज मंजूर झाले असून प्रचारासाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळाला आहे. प्रभावी प्रचारयंत्रणा राबवून मतदारापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. धनुष्यबाण चिन्हावरती एकाच वेळी एवढे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत याचा मनस्वी आनंद आहे. आचारसंहितेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनचे नेते एकनाथरावजी शिंदे हे नगरविकास खात्याचे मंत्री असल्याने सांगोला नगरपालिकेच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदाभाऊ माने यांचा विजय आजच घोषित करण्यात येत असून नगरसेवक पदाचे सर्वच उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी विजयदादा शिंदे म्हणाले, राजकारणात बापूंना एकटे पाडल्याची चर्चा होत असून भाजप- शेकाप -राष्ट्रवादीयांच्या तालुक्यातील आघाडीवर जनतेची खूप मोठी नाराजी आहे. या नाराजीचा फायदा शिवसेना शिंदे गटाला नगरपालिका निवडणुकीत शंभर टक्के होणार आहे. यावेळी काही तरुणांचे शिवसेनेत प्रवेश संपन्न झाले.
यावेळी माजी नगरसेवक प्रा. संजय देशमुख म्हणाले, स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आधारित माजी आमदार शहाजीबापू पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे कार्य करीत आहेत. या निवडणुकीत उमेदवार देताना शहाजी बापू पाटील यांनी सर्व समाजातील उमेदवारांचा समावेश केला आहे सांगोला नगरपालिका निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शिवसेना गटाचे सर्वच उमेदवार विजयी होणार आहेत. यावेळी उपस्थित त्यांच्या आभार नितीन इंगवले यांनी मानले
आमदार शहाजीबापू पाटील यांनी 2016 च्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वसाधारण जागेवरती लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी राणीताई माने यांना उमेदवारी दिली. परंतु या निवडणुकीमध्ये महायुतीचे नगराध्यक्षपदव आठ नगरसेवक निवडून आले होते. परंतु त्यावेळी बहुमत नसल्याने नगरपालिकेच्या विकास कामांमध्ये मोठी अडचण आली. सध्या नगरपालिका निवडणुकीसाठी बापूंची टीम चांगली आहे . 2025 च्या नगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक वातावरणही चांगले आहे. धनुष्यबाण चिन्हवरती नगराध्यक्षपदासह तेवीस नगरसेवकपदाचे उमेदवार निवडणूक लढवत असून यासाठी बापूंनी सर्वांना ताकद दिली आहे. या निवडणुकीत विजय हा आपलाच असून विजयानंतर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना सोबत घेऊन आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला जाऊया आपल्या सर्वांच्या विजयाची 100 टक्के खात्री आहे.
मा.आनंदाभाऊ गोरख माने, नगराध्यक्ष पदाचे शिवसेनेचे उमेदवार