
सांगोला/प्रतिनिधी ः सांगोला तहसिल कार्यालयामध्ये शासनमान्य असलेल्या सेतू कार्यालयामध्ये सांगोला शहर व तालुक्यातील अनेक नागरीक आपल्या विविध कामासाठी जातीचे दाखले, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिनिअर, अॅपेडेव्हिड हे करण्यासाठी या कार्यालयामध्ये येत असतात मात्र या कार्यालयामध्ये शासनाने ठरविलेल्या दराप्रमाणे पैशाची मागणी न करता नागरीकांना वेठीस धरून अवाढव्य अशी पैशाची मागणी करून ते पैसे मिळाल्यानंतरच त्यांचे दाखले दिले जातात अन्यथा त्यांना हेलपाटे मारण्यास भाग पाडले जात आहे. या कार्यालयाचे एक मिनी खाजगी कार्यालय तहसिल कार्यालयाच्या समोर असून नागरीकांना मुद्दामहून शासनाच्या शासनमान्य असलेल्या सेतू कार्यालयातील जे काम होणे अपेक्षित आहे ते काम सेतू कार्यालयामध्ये न होता तहसिल कार्यालयाच्या समोर असलेल्या खाजगी कार्यालयामध्ये नागरीकांना त्यांचे काम करण्यासाठी पाठविले जात आहे व या खाजगी कार्यालयामधून अॅपेडेव्हिड करणे, दाखले काढणे या प्रकारचे काम केले जात आहे. परंतु हे काम नागरीकांची अडवणुक करून त्यांच्याकडून जाणूनबुझून जास्तीचे रक्कम घेवून मगच केले जात आहे. सांगोला तहसिल कार्यालयामध्ये हे फक्त एकच कार्यालय असल्यामुळे नागरीकांना नाईलाजास्तव आपले काम पूर्ण करण्यासाठी या खाजगी कार्यालयामध्ये मागणी केले तेवढे पैसे आपल्या खिशातून काढून द्यावे लागत आहे. तरी या शासकीय कार्यालयातून होणारी लूट थांबविण्याचे मोठे आवाहन सांगोला तहसिल कार्यालयाचे नव्याने पदभार घेतलेल्या मा. तहसिलदार यांना असणार आहे या नागरीकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे तहसिलदार यांनी लक्ष देवून या बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या मिनी खाजगी कार्यालयावर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.