
सांगोला / प्रतिनिधी
सांगोला तहसिल कार्यालयामधून दिल्या जाणार्या सेवा व सुविधा यांचे दर हे येथील कर्मचारी हे आपल्या मनमर्जीप्रमाणे त्याचे दर आकारून नागरीकांकडून अवाढव्य पैशाची मागणी करीत असल्याच्या विरोधात सांगोला तहसिलदार यांना याबाबत निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये सांगोला तहसिल कार्यालयात शासनमान्य सेतू कार्यालय असून या कार्यालयामधून नागरीकांना उत्पन्न दाखला, जातीचे दाखले, नॉन क्रिमीनिअर, डोमॅसाईट, अॅपेडेव्हिट करणे या सारखे कामे केली जात असतात परंतु येथील कर्मचारी हे मात्र नागरीकांची अडचण ओळखून त्यांना
शासनाने ठरविलेल्या दरापेक्षा जास्तीचे रक्कमेची मागणी करून ती रक्कम विद्यार्थी, नागरीक व शेतकरी वर्गातील लोकांनी दिली तरच त्यांना हे वरील कागदपत्रके दिली जात असल्याची तक्रार मा. तहसिलदार साो यांना देवून वरील गोष्टीचे गांभीर्य ओळखून यावर योग्य ती कायदेशीर करून येथून पुढे सेतू कार्यालयामध्ये शासनाने ठरविलेले दरपत्रक सूचना फलक दर्शनीय भागामध्ये लावून नागरीकांकडून त्याप्रमाणे दर घेण्याचे येथील सेतू, चालक व कर्मचारी सक्त सूचना देण्यात यावे याप्रमाणे निवेदन देण्यात आले यावेळी अवि देशमुख, सुजल कोळवले, मोहसीन मुलाणी, मनोज देशमुख, ज्ञानेश्वर शेजाळ व इतर यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थी, शेतकरी व नागरीकांची लूट थांबली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण करणार
मोहसीन तांबोळी, सामाजिक कार्यकर्ता
चौकशी करून संबंधीत सेतू कार्यालयातून असे प्रकार होत असल्यास त्याची चौकशी करून संबंधीतावर कारवाई केली जाईल.
मा. तहसिलदार सांगोला तहसिल कार्यालय सांगोला