
सांगोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकांची मला पसंती : विश्वेश झपके
सांगोला शहरातील वज्राबाद पेठ, तेली गल्ली, कुंभार गल्ली , मेन रोड येथे कॉर्नर सभा संपन्न
सांगोला /प्रतिनिधी
सांगोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सांगोला शहरातील सुज्ञ नागरिक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत. मी करत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नामुळे लोकांचा माझ्यावर विश्वास वाढत आहे. नक्कीच सांगोला शहरातील नगरपालिकेचा कारभार पारदर्शक करण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा नगरपालिकेच्या पूर्ण करण्यासाठी, सांगोला नगरपालिकेचे गत वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी सांगोला शहरातील नागरिकांनी नगराध्यक्षपदी मला काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन अपक्ष उमेदवार विश्वेश झपके यांनी व्यक्त केले. सांगोला शहरातील वज्राबाद पेठ, तेली गल्ली, कुंभार गल्ली , मेन रोड मारुती मंदिरासमोर येथे अपक्ष उमेदवार विश्वेश झपके यांच्या प्रचारार्थ उत्साही वातावरणात कॉर्नर सभा संपन्न झाल्या. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यापीठावर माजी नगराध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके, प्रभाग क्रम माध्यमातून क्रमांक चारच्या नगरसेविका पदाच्या उमेदवार स्वाती अंकलगी, नगरसेवक पदाचे उमेदवार दिलावर तांबोळी , डॉ चव्हाण, आदि मान्यवर उपस्थित होते. सदर कॉर्नर सभेस उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके यांनी सांगोला शहरातील नगरपालिकेच्या सध्याच्या कारभाराबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून सर्वसामान्यांची कामे होत नसल्याची खंत व्यक्त केली. सध्या सांगोला नगरपालिकेच्या नगरपालिकेतून कशा पद्धतीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात शहरातील दुर्लक्षेमुळे आले आहे, सर्वसामान्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधांचा अभाव कसा जाणवत आहे, यावरती प्रहार करीत अपक्ष उमेदवार विश्वेश झपके यांना निवडून दिले तर नक्कीच सांगोला शहराच्या विकासासाठी आणि सांगोला शहरात वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून विकसित सांगोला करण्यासाठी प्रयत्न केला जाईल याचे व्हिजन उपस्थितांसमोर मांडले यावेळी प्रभाग क्रमांक चारच्या नगरसेविका पदाच्या उमेदवार स्वाती अंकलगी आणि तांबोळी दिलावर , प्रभाग नऊ चे ढोले उत्तम ,राजनंदिनी ढाणके, प्रभाग दहा चे उमेदवार संतोष महिमकर आणि हिना मणेरी यांनीही मनोगत व्यक्त करून आम्हाला निवडून देण्याचे आवाहन केले. या सर्वच कॉर्नर सभेसाठी नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला.
