Thursday, January 15, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

सांगोल्यात राष्ट्रवादीला नवे बळ, प्रमुख कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश

नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडींचा भव्य कार्यक्रम, तालुकाध्यक्ष अतुल पवार यांची माहिती

संपादक by संपादक
January 1, 2026
in political, sangola
0

सांगोला (प्रतिनिधी): 

सांगोल्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केलेले अतुल (मालक) पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली असून, या निवडीनंतर प्रथमच तालुकास्तरीय संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहे. प्रमुख कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश आणि नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडींसाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता, वासूद रोड, कर्मवीर नगर, रोड क्र. 7, सांगोला येथे होणार असून, विविध पक्षांतील अनेक प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. याच कार्यक्रमात तालुकास्तरीय नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी अधिकृतरीत्या जाहीर केल्या जाणार आहेत.

याबाबत बोलताना तालुकाध्यक्ष अतुल पवार म्हणाले,

सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देत, त्यांच्या कर्तृत्वाला संधी देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. तालुक्यातून सक्षम नेतृत्व घडावे, यासाठी मी सातत्याने काम करणार आहे.

अतुल पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आगामी काळात सांगोला तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद लक्षणीयरीत्या वाढेल, अशी चर्चा राजकीय व सामाजिक वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

सांगोला नगरपरिषदेमधील कर्मचारी नंदकुमार बनकर यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न

Next Post

अजनाळे गावच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही;माजी आमदार शहाजी बापू पाटील

संपादक

संपादक

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post

अजनाळे गावच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही;माजी आमदार शहाजी बापू पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697