सांगोला /प्रतिनिधी
सांगोला तालुक्याच्या विकासासाठी स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्या बरोबर राजकारण केले या तालुक्याचा दुष्काळ संपवण्यासाठी निवडणुका लढवल्या या सांगोला तालुक्याच्या विकासासाठी व अजनाळे गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे मत माजी आमदार ड शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केले.
काल मंगळवार दि 30 डिसेंबर रोजी नूतन नगराध्यक्ष आनंद भाऊ माने व सर्व नगरसेवकांचा अजनाळे पंचायत समितीचे गणाच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी विजय शिंदे, नगरसेविका वैशाली सावंत, प्रशांत उर्फ पप्पू धन वजीर, ज्ञानेश्वर तेली,राणी माने, गोदाबाई बनसोडे अरुण पाटील, काशिलिंग गावडे, चैतन्य राऊत, अनिता केदार, नितीन इंगोले, गुंडा दादा खटकाळे यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले की, शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या तालुक्याच्या विकासासाठी कोट्यावधी रुपये मंजूर करून आणले आहेत या तालुक्यातील मान नदीला कोरडा नदीला कालव्याचा दर्जा दिला आहे. अजनाळे व परिसरातील एक एकर ही क्षेत्र कोरड ठेवत नाही पाण्याच्या योजना जवळपास सर्वच मार्गी लागले आहेत त्यामुळे एक दोन वर्षात कोणताही शेतकरी पाणी मागणार नाही.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून महिलांचा सन्मान केला त्यामुळेच आज महिला सरपंच, नगराध्यक्ष, आमदार, खासदार या पदावर गेल्या आहेत. या तालुक्यातील जनतेच्या स्वाभिमानाला ठेच लावण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर मी शांत बसणार नाही सांगोला तालुक्याची ओळख ही स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांनी शांत संयमी आणी सुसंस्कृत राजकारण अशी ओळख निर्माण केली आहे.जर कोणी हुकूमशाही दादागिरी केली तर त्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल असा इशारा यावेळी माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिला आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मधुकर पुजारी, हमुनाना येलपले, बाळासो पुजारी, दत्तात्रय कोळवले, गोरख येलपले,भारत येलपले, माणिक कोळवले, संदिप कुरे, यांनी विशेष परिश्रम घेतले
