Tuesday, October 27, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

शेतकरी कामगार पक्ष हा कोणत्याही एका कुटुंबाचा नसून तो शेतकरी व कष्टकरी जनतेचा – आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
January 4, 2026
in political, sangola, आमदर बाबासाहेब देशमुख
0

सांगोला/प्रतिनिधी ः 

शेतकरी कामगार पक्ष हा कोणत्याही एका कुटुंबाचा नसून तो शेतकरी व कष्टकरी जनतेचा आहे. येणार्‍या निवडणुकांबाबत कार्यकर्ते जो निर्णय देतील, तोच निर्णय स्वीकारून त्याप्रमाणे भूमिका घेतली जाईल, असे स्पष्ट आश्‍वासन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिले.

सांगोला येथे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. आमदार डॉ. देशमुख पुढे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शेकाप आघाडीला शहरात पराभव स्वीकारावा लागला. त्या पराभवाची नैतिक जबाबदारी मी स्वतः स्वीकारतो. यापुढे होणार्‍या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते ज्या दिशेने निर्णय देतील, त्या दिशेने आघाडी अथवा स्वतंत्र निर्णय घेतला जाईल. स्व. आबासाहेबांच्या विचारांचा माझ्यावर प्रभाव असून तो विचार मी कधीही तडा जाऊ देणार नाही.

हिवाळी अधिवेशनात सांगोला शहर व तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्‍नांवर विधानसभेत आवाज उठवला आहे. यामध्ये शहरातील नागरी प्रश्‍नांसह चारा छावणीच्या प्रलंबित अनुदानाचा मुद्दा मांडण्यात आला असून तो मार्गी लागण्याच्या प्रक्रियेत आहे. शेतकर्‍यांसाठी सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात आली आहे. तसेच सकाळ-संध्याकाळचे लोडशेडिंग बंद करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

टेंभू-म्हैसाळ योजनेतून वंचित राहिलेल्या क्षेत्रांचा समावेश करून टेंभू योजनेसाठी 70 कोटी रुपयांची तरतूद मंजूर करून घेतली आहे. माण व कोरडा नदीवर बंधारे भरुन देण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मका उत्पादन होत असून येत्या एक-दोन दिवसांत मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.

या मेळाव्यासाठी तालुका चिटणीस दादासाहेब बाबर, सांगोला तालुका बाजार समितीचे अध्यक्ष समाधान पाटील, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष रमेश जाधव, नंदकुमार शिंदे, आबासाहेब बंडगर, शिवाजी शेजाळ, नवनाथ शिंगाडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी डॉ. निकीता देशमुख, शिवाजी व्हनमाने, विनायक कुलकर्णी, गजेंद्र कोळेकर, कल्पना शिंगाडे, संगम धांडोरे, नंदकुमार शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

या मेळाव्यात विविध वस्तूंचे लकी ड्रॉची सोडत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते काढण्यात आले.

 

हमें पसंद है शांत रहना,

इसे हमारी कमजोरी मत समझना

हमें पसंद है शांत रहना,

इसे हमारी कमजोरी मत समझना

असा शेर सांगत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर व माझ्या कुटुंबीयांवर खालच्या पातळीवर टीका-टिप्पणी केली जात आहे. राजकीय टीका स्वीकार्य आहे; मात्र वैयक्तिक व कुटुंबावर होणारी टीका मी कधीही सहन करणार नाही. विरोधकांचा राजकीय डाव मला समजतो. यापुढे माझ्या कुटुंबीयांचा व शेकापच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय अथवा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

अजनाळे गावच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही;माजी आमदार शहाजी बापू पाटील

Next Post

आपुलकी प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post

आपुलकी प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
September 29, 2026
0

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न बहिर्जी नाईक समाधीस्थळ व शुक्राचार्य देवस्थान दर्शन; ऐतिहासिक, धार्मिक...

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा – मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा – मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा - मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपा सोलापूर ग्रामीणच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान 2026...

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख महोत्सवात भव्य नोकरी भरती मेळाव्याचे...

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान*

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान*

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान* सांगोला (प्रतिनिधी) रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समजून २३ मे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक...

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 22, 2026
0

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल     सांगोला/प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील तहसील कार्यालयात शासकीय कामकाजात अडथळा...

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान 

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान 

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 21, 2026
0

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान  सांगोला /प्रतिनिधी  सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष,...

*मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव*

*मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव*

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 17, 2026
0

  *मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव* *चावीमनला पकडून ठेवत बळजबरीने पाणी सोडल्याचा आरोप** सांगोला : प्रतिनिधी शहरातील मस्के कॉलनी परिसरात...

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 15, 2026
0

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन; मानवतेच्या सेवेचे २३ वे वर्ष सांगोला (प्रतिनिधी): सांगोले...

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपट देशमुख यांचे दुःखद निधन

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपट देशमुख यांचे दुःखद निधन

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 12, 2026
0

सांगोला  :प्रतिनिधी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील तथा विक्रमवीर आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र...

Load More

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697