Wednesday, June 3, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

*मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव*

चावीमनला पकडून ठेवत बळजबरीने पाणी सोडल्याचा आरोप**

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 17, 2026
in sangola
0
*मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव*

 

*मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव*

*चावीमनला पकडून ठेवत बळजबरीने पाणी सोडल्याचा आरोप**

सांगोला : प्रतिनिधी

शहरातील मस्के कॉलनी परिसरात पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून शनिवारी सकाळी तणावपूर्ण प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. कॉलनीतील काही नागरिकांसह शिक्षक असलेल्या जबाबदार नागरिकांनी त्या परिसरात पाणी सोडण्याची जबाबदारी असलेल्या चावीमनला पकडून ठेवत बळजबरीने पाणी सोडून घेतल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मस्के कॉलनीमध्ये एकूण पाच रस्ते असून त्यापैकी एक आणि दोन क्रमांकाच्या रस्त्यांवर पूर्वीपासून नियमितपणे पाणी सोडले जात आहे. मात्र तीन, चार आणि पाच क्रमांकाच्या रस्त्यांवरील काही नागरिकांना पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार होती. याच कारणावरून आज सकाळी चावीमनला पकडून ठेवत पाणी सोडून घेतल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, हा प्रकार धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत असून पाणीपुरवठ्यासारख्या संवेदनशील प्रश्नावर अशा प्रकारे दबाव टाकणे चुकीचे असल्याचे मत मांडले जात आहे. संबंधित घटनेची चौकशी करून चावी मनवर दबाव टाकून पाणी सोडून घेणाऱ्या दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान 

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post
प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान 

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697