Wednesday, June 3, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान 

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 21, 2026
in sangola
0
प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान 

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान 

सांगोला /प्रतिनिधी
 सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल व सांगोला नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा विद्यामंदिर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 165 रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. 
कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्राचे पूजन करून रक्तदान शिबिरास सुरुवात झाली. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती अजय सरगर, चिनके गावचे सरपंच नाथा खंडागळे, माजी प्राचार्य के. वाय.पाटील, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर मिसाळ, सुनील आडसूळ,शिवाजी बनसोडे, प्रशांत डोंगरे, उपसरपंच उत्तम पवार,दिगंबर बंडगर, को.रा.वाघमारे.माजी सरपंच पिंटू बंडगर, गोरख आदाटे, उमेश चांडोले, सनगर समाजाचे अध्यक्ष बाळासाहेब कारंडे, प्रभू शेळके, नाझरा विद्यामंदिर प्रशालेचे प्राचार्य अमोल गायकवाड, नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील,पर्यवेक्षक उत्तम सरगर, विनायक पाटील, प्रदीप धुकटे, रविराज शेटे, अक्षय ब्लड बँक सोलापूरचे कर्मचारी आदी उपस्थित होते. 
सकाळी 11 वाजेपर्यंत रक्तदात्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला, त्यानंतर दुपारच्या सत्रात उन्हामुळे रक्तदान थोडे मंदावले. त्यानंतर परत सायंकाळी चार वाजता रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदानाच्या या सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला. दिवसभर चाललेल्या या रक्तदान शिबिरास सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके,विलास क्षीरसागर, मुख्याध्यापक श्रीकांत लांडगे,उपमुख्याध्यापक चारुदत्त जगताप,पर्यवेक्षक काकासाहेब नरुटे, रेवनील ब्लड बँकेचे सोमेश यावलकर,लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रा. एन डी बंडगर,नरेंद्र होनराव,हेमंत नलवडे,प्रशांत रायचुरे, अजिंक्य झपके आदी मान्यवरांनी भेट देऊन रक्तदात्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नाझरा येथील शिबिर यशस्वी करण्यासाठी विद्यामंदिर परिवारातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.शेवटी मुख्याध्यापक अमोल गायकवाड यांनी सर्व रक्तदात्यांचे व रक्त संकलन करणाऱ्या संस्थांचे आभार व्यक्त केले.
HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Tags: sangolavidyamandir
Previous Post

*मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव*

Next Post

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post
तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697