Wednesday, June 3, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपट देशमुख यांचे दुःखद निधन

मूळगावी पेनूर (ता. मोहोळ) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 12, 2026
in sangola
0
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपट देशमुख यांचे दुःखद निधन

सांगोला  :प्रतिनिधी

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील तथा विक्रमवीर आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र पोपट गणपतराव देशमुख (वय ६९) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (ता. ११) निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते.

पोपट देशमुख हे मूळचे मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील रहिवासी होते. त्यांचे वडील स्वर्गीय गणपतराव देशमुख हे राज्याच्या राजकारणात दीर्घकाळ सक्रिय राहून विक्रमी अकरा वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, इतक्या मोठ्या राजकीय वारशाची पार्श्वभूमी असतानाही पोपट देशमुख यांनी कधीही सक्रिय राजकारणात सहभाग नोंदवला नाही. ते साधेपणाने आपल्या मूळ गावी राहून सामाजिक व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत होते.

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या राजकीय प्रवासात व त्यांना आमदार बनविण्यामागे पोपट देशमुख यांचे मोलाचे योगदान असल्याचे मानले जाते. शांत, संयमी व मनमिळावू स्वभावामुळे त्यांना परिसरात विशेष मान होता.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवारी (ता. १२) सकाळी ९ वाजता पेनूर (ता. मोहोळ) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

लायन्स क्लब ऑफ सांगोला च्या अध्यक्षपदी ला.प्रशांत रायचुरे यांची निवड; सचिवपदी ला.प्रा.प्रसाद खडतरे तर खजिनदारपदी ला. प्रा.निलेश नागणे

Next Post

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post
प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697