Wednesday, June 3, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

मानवतेच्या सेवेचे २३ वे वर्ष

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 15, 2026
in sangola
0
प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन; मानवतेच्या सेवेचे २३ वे वर्ष

सांगोला (प्रतिनिधी):

सांगोले नगरीचे माजी नगराध्यक्ष,विरशैव सभा माजी प्रांतिक अध्यक्ष,माजी प्रांतिक सदस्य काँग्रेस,सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसारक मंडळ उपाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना प्रांत ३२३४ डी १ चे माजी प्रांतपाल, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व विद्यामंदिर परिवार, लायन्स क्लब, महाराष्ट्र साहित्य परिषद, नगर वाचन मंदिर सांगोला शाखांचे मार्गदर्शक मा. प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या आचार-विचारांतील सेवाभाव प्रमाण मानून यावर्षीही त्यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या २२ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाचे हे २३ वे वर्ष असून, दरवर्षी १००० पेक्षा जास्त रक्तदाते या मानवतेच्या कार्यात सहभागी होतात.
एप्रिल आणि मे महिन्यात कडक उन्हाळ्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. सुट्यांचा काळ आणि वाढत्या अपघातांमुळे रक्ताची निकड भासत असताना, थॅलसेमिया, डायलिसिस आणि शस्त्रक्रिया असलेल्या रुग्णांना रक्तासाठी धावपळ करावी लागते. हीच सामाजिक गरज ओळखून ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ या भावनेतून सांगोला तालुक्यातील विविध ठिकाणी या शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे.
यावर्षीचे शिबिर बुधवार दि. २० मे २०२६ रोजी लोणविरे हायस्कूल लोणविरे, गुरुवार दि. २१ मे २०२६ रोजी नाझरा विद्यामंदिर प्रशाला नाझरा, तसेच शुक्रवार दि. २२ मे २०२६ रोजी पांडुरंग कॉम्प्लेक्स आदर्श पतसंस्था शेजारी कोळा व जि. प. प्रा. मुलींची शाळा नं. १ जुने कोर्ट जवळ, सांगोला येथे सकाळी ८:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत संपन्न होत आहे. तरी सांगोला शहर व तालुक्यातील सर्व शैक्षणिक, साहित्यिक, राजकीय, सामाजिक व सेवाभावी संस्थांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून मानवतेचे महान कार्य करावे, असे आवाहन विद्यामंदिर परिवार व लायन्स क्लब सांगोला यांच्या वतीने करण्यात येत आहे.
तुमच्या रक्ताचा एक थेंब, दुसऱ्याच्या जीवनाची उमेद ठरू शकतो; चला, मानवतेचे हे महादान करूया!
 *रक्तदान शिबिर स्थळ व वेळ:* बुधवार दि. २० मे २०२६ लोणविरे हायस्कूल लोणविरे,गुरुवार दि. २१ मे नाझरा विद्यामंदिर प्रशाला नाझरा, शुक्रवार दि. २२ मे पांडुरंग कॉम्प्लेक्स कोळा व जि. प. मुलींची शाळा नं. १ सांगोला. सर्व ठिकाणी वेळ सकाळी ८ ते सायं. ६ पर्यंत राहील.
HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपट देशमुख यांचे दुःखद निधन

Next Post

*मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव*

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post
*मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव*

*मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697