Wednesday, June 3, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख

महोत्सवात भव्य नोकरी भरती मेळाव्याचे आयोजन ; सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा : उद्योगपती भाऊसाहेब रुपनर 

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
in sangola
0
पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख

महोत्सवात भव्य नोकरी भरती मेळाव्याचे आयोजन ; सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा : उद्योगपती भाऊसाहेब रुपनर 

सांगोला : प्रतिनिधी

पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फॅबटेक च्या पुढाकाराने मोठमोठ्या शहरातील 40 नामवंत कंपन्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यातून 300 हून अधिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासह महोत्सवाचा शुभारंभ सेने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तसेच महोत्सव दरम्यान मनोरंजन, मार्गदर्शन, महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अँड सचिन देशमुख व फॅबटेक समूहाचे सर्वेसर्वा भाऊसाहेब रुपनर यांनी पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेसाठी पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब काटकर, अँड गजानन भाकरे उपस्थित होते. 

   पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त राज्य आणि देशभरात सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सांगोला येथे महिलांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिर संपन्न होणार आहे. या मार्गदर्शन शिबिरासाठी पालकमंत्री जयकुमारभाऊ गोरे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, यांच्यासह विविध राजकीय सामाजिक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. 

 

  तसेच रक्तदान शिबिर, बचत गट स्टॉल, करिअर मार्गदर्शन स्टॉल ठेवले आहे. फनी गेम्स स्टॉल आहे. तसेच सांगोला येथे बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची एक मोठी आणि सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. सोलापूर , सांगली , कोल्हापूर आणि पुणे परिसरातील नामांकित कंपन्यांमध्ये विविध पदांसाठी भव्य नोकरी भरती मेळाव्याचे आयोजन दि 29 मे 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत करण्यात आले आहे. या मेळाव्यात नामांकित फॅबटेक ग्रुपसह सोलापूर आणि पुणे परिसरातील अग्रगण्य ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इंजिनिअरिंग कंपन्या थेट सहभागी होत आहेत. आयटीआय , डिप्लोमा, पदवीधर  आणि फ्रेशर्स उमेदवारांसाठी आणि 10 वी, 12 वी तसेच 35 वर्षाखालील महिलासाठी स्पॉरकोन गारमेंट, सूतगिरणी मध्ये ही मोठी संधी आहे. 

   सांगोला येथील नामांकित फॅबटेक ग्रुपच्या विविध संस्थांमध्ये अनेक पदांची भरती केली जाणार आहे. फॅबटेक मल्टिस्टेट बँक  मुख्य कार्यालय सांगोला येथे असलेल्या या बँकेत शाखा व्यवस्थापक, गोल्ड लोन ऑफिसर, सेल्स ऑफिसर, क्लार्क/कॅशियर आणि पिग्मी एजंट या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. फॅबटेक सुत गिरणी व गारमेंट (सोलापूर/सांगोला) येथे मशीन ऑपरेटर, सुपरवायझर आणि लेबर अशा स्थानिक पातळीवरील पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. महिलांना प्राधान्य असेल यासह शैक्षणिक विभाग: फॅबटेक टेक्निकल कॅम्पस अंतर्गत इंजिनिअरिंग कॉलेज आणि पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक, प्राध्यापक, लॅब असिस्टंट आणि कनिष्ठ लिपिक पदांच्या जागा भरल्या जातील. सोलापूर व पुणे परिसरातील ऑटोमोबाईल आणि इंजिनिअरिंग क्षेत्र

या मेळाव्यात ऑटोमोबाईल क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या कंपन्या उमेदवारांची निवड करणार आहेत. प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड (सोलापूर चखऊउ): येथे इंजिनिअर मशीन ऑपरेटर आणि ट्रेनी पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम्स व भारत फोर्ज (पुणे): टाटा ऑटोकॉम्पमध्ये असोसिएट ट्रेनी, अप्रेंटिस आणि डिझाइन इंजिनिअर्सची निवड केली जाईल. तसेच, कल्याणी ग्रुपच्या ’भारत फोर्ज’ कंपनीत आयटीआय फ्रेशर्स, मशीन ऑपरेटर आणि क्वालिटी अश्युरन्स प्रोफेशनल्ससाठी मोठी संधी आहे. पुणे परिसरातील या मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग, सेल्स टीम, ऑपरेटर आणि असेंब्ली लाईनवरील अप्रेंटिसशिपसाठी थेट निवड केली जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमेशन आणि इतर क्षेत्रातील कंपन्या याशिवाय धूत ट्रान्समिशन (वायर हार्नेस ऑपरेटर – महिला व पुरुषांसाठी), जॉन डिअर (ट्रॅक्टर उत्पादन क्षेत्र), पार्क रोबोटिक्स व पारिजात ऑटोमेशन (इंडस्ट्रियल ऑटोमेशन), तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील जॅबील (गरलळश्र), किमली, राधा मोटर्स आणि रेविझत प्रा. लि. या कंपन्यांमध्येही उमेदवारांना रोजगाराची सुवर्णसंधी मिळणार आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अद्ययावत बायोडाटा आणि शैक्षणिक कागदपत्रांसह या मेळाव्यात उपस्थित राहावे. जे उमेदवार थेट उपस्थित राहू शकत नाहीत, त्यांनी फॅबटेक ग्रुप, टाटा ऑटोकॉम्प, भारत फोर्ज आणि प्रिसिजन कॅमशाफ्ट्सच्या अधिकृत करिअर वेबसाईट्स आणि लिंक्डइन पेजवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख आणि श्री भाऊसाहेब रुपनर यांच्याकडून करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील तरुणांना हक्काचा रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने हा मेळावा मैलाचा दगड ठरेल. असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला. सदर पत्रकार परिषदेचे आभार बाळासाहेब काटकर यांनी मानले.

 

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान*

Next Post

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा – मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post
प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा – मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा - मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697