Wednesday, June 3, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान*

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
in sangola
0
*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान*

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान*

सांगोला (प्रतिनिधी)

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समजून २३ मे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष,लायन्स माजी प्रांतपाल प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त विद्यामंदिर परिवार व लायन्स क्लब सांगोला आयोजित भव्य रक्तदान शिबिरामध्ये २० मे लोणविरे १३८,२१ मे नाझरा १६५ व २२मे २०२६ कोळा येथे १४१ व सांगोला ५३७ असे एकूण ९८१ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेच्या कल्याणाचे अनमोल कार्य केले.
सांगोला येथील शिबिराचे उद्घाटन लायन्स विभागीय सभापती ॲड.ला.श्रीनिवास कटकुर, उपविभागीय सभापती ला.सोमशेखर भोगडे, नगराध्यक्ष आनंदा माने,शिक्षण,सा.ता.उ.शि.मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांचे हस्ते व डॉ.शैलेश डोंबे,माजी नगराध्यक्ष सुहास होनराव,उद्योगपती विलास क्षीरसागर,कॅबिनेट ऑफिसर सी.ए.उत्तम बनकर, संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था सदस्य चंद्रशेखर अंकलगी, प्राचार्य बिभीषण माने, उपमुख्याध्यापक चारूदत्त जगताप,सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.प्रा.नवनाथ बंडगर, यांच्या उपस्थितीत फीत कापून व श्रीफळ वाढवून शिबिराचे उद्घाटन झाले.
या शिबिरासाठी संस्था उपाध्यक्ष ॲड विजयसिंह चव्हाण,सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत,सदस्य दिगंबर जगताप,प्रसाद झपके, विद्यामंदिर परिवारातील सेवानिवृत्त व विद्यमान प्रशासकीय अधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, लायन्स क्लब सांगोला पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

सदर शिबिराला शिक्षण,आरोग्य सभापती जि‌.प‌.सोलापूर चेतनसिंह केदार, नगरसेवक ज्ञानेश्वर तेली,लायन्स क्लब सांगोला संचालक गिरीशभाऊ नष्टे,ॲड संजीव शिंदे यांच्यासह शैक्षणिक,सामाजिक, साहित्यिक,राजकीय, क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली.
या शिबिरासाठी रेवनील ब्लड बँक सांगोला, सिद्धेश्वर ब्लड बैंक सोलापूर,एम.एस.आय सांगली, सांगोला ब्लड बँक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्राचार्य बिभिषण माने यांनी केले. सूत्रसंचालन ला.उन्मेश आटपाडीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन ला. प्रा.नवनाथ बंडगर यांनी केले. तर समारोप कार्यक्रमामध्ये शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदाते उपलब्ध करून रक्तदान केल्याबद्दल प्रा.नवनाथ बंडगर,प्रा‌.मोहन भोसले यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.व शेवटी संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके यांनी विद्यामंदिर परिवार व लायन्स क्लबच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे अंतःकरण पूर्वक आभार मानले.

   प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सरांच्या निस्पृह समाजसेवेचे तेज आणि त्यांच्या विचारांतील तत्त्वनिष्ठता यावर जनतेने मनात जपलेली निष्ठा या रक्तदान शिबिरातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली. सरांच्या ७२ व्या वाढदिवसाच्या औचित्याने मानवतेच्या हाकेला साद देत लोणविरे येथून १३८, नाझरा येथून १६५, कोळा येथून १४१ आणि सांगोला येथे ५३७ अशा एकूण ९८१ रक्तदात्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी उत्स्फूर्त रक्तदान केले. ऐन उन्हाळ्याच्या तीव्र टंचाईत एवढ्या मोठ्या संख्येने पुढे येत सर्व स्तरांतील संवेदनशील दात्यांनी व्यक्तीच्या आदराचे रूपांतर समाजोपयोगी कार्यात करण्याचे एक सर्वोच्च उदाहरण प्रेरणा देणारे आहे. ‌

 

 

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Tags: sangola vidyamandir
Previous Post

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल

Next Post

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post
पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697