सांगोल्यात ‘शिवसेनेचा भगवा’; नगराध्यक्षपदी आनंदा माने यांचा दणदणीत विजय!
5 हजार 140 मतांनी निर्णायक आघाडी,
भाजपाचे मारुतीआबा बनकर पराभूत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेच्या लढतीत शिवसेनेचा झेंडा 

सांगोला/प्रतिनिधी :
सांगोला नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 मधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार आनंदा गोरख माने यांनी 13,668 मते मिळवत विरोधकांवर 5,140 मताधिक्याने स्पष्ट व निर्णायक आघाडी घेत दणदणीत विजय संपादन केला. राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेणारी ही निवडणूक अखेर शिवसेनेच्या विजयाने संपन्न झाली. या निवडणुकीत एकूण 26,186 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पडल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी सैपन नदाफ यांनी केली. प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपाला धक्का विजयी आनंदा माने यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मारुती तुळशीराम बनकर यांना 8,528 मते मिळाली. भाजपाचे उमेदवार मारूतीआबा बनकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी थेट प्रचार सभा घेतल्या होत्या. तर शिवसेनेच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी आमदार शहाजीबापू पाटील मैदानात उतरले होते. त्यामुळे ही निवडणूक सांगोल्यापुरती न राहता राज्यपातळीवरील प्रतिष्ठेची लढत बनली होती. अपक्ष उमेदवार झपके विश्वेश प्रबुध्दचंद्र यांनी 2,775 मते मिळवत तिसरा क्रमांकाची मते मिळवली. इतर शहर विकास आघाडी व अपक्ष उमेदवारांमध्ये भाकरे बापूसाहेब भगवान (351), इंगोले राहुल श्रीमंत (209), नागणे स्वप्नील विश्वंभर (116), चंद्रकांत हणमंत चव्हाण (97), खतीब मोहसीन इलाही (74), मंडले उमेश ज्ञानू (68), राऊत मोहन विष्णु (42) अशी मते मिळाली. तर नोटा पर्यायाला 133 मते मिळाल्याने मतदारांचा असंतोषही अधोरेखित झाला. विजयानंतर सांगोल्यात जल्लोष; विकासाला गती देण्याचे आश्वासन निकाल जाहीर होताच शिवसेना कार्यकर्ते व समर्थकांनी शहरात जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली. विजयी उमेदवार आनंदा माने यांनी नागरिकांचे आभार मानत, सांगोला शहराच्या पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, रोजगार आणि नागरी सुविधांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाचा वेग वाढवू, असा विश्वास व्यक्त केला. या निवडणुकीत शिवसेनेने विविध प्रभागांमध्ये दमदार कामगिरी करत आपले वर्चस्व निर्माण केल्याचे दिसून येत आहे. नगरसेवक पदासाठी प्रभागनिहाय विजयी उमेदवार खालीलप्रमाणे आहेत. प्रभाग क्र. 1 अ व प्रभाग क्र. 11 अ या प्रभागातील उमेदवार अनुक्रमे राणी आनंदा माने व केदार-सावंत सुजाता चेतनसिंह हे दोन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. * प्रभाग क्रमांक 1: या प्रभागातील जागा क्रमांक ’1 ब’ (सर्वसाधारण) मधून शिवसेनेचे मदने रामचंद्र बापू 1175 मते मिळवून विजयी झाले आहेत. * प्रभाग क्रमांक 2: * जागा ’2 अ’ (अनुसूचित जाती) मधून शिवसेनेचे प्रशांत बबन धनवजीर 1660 मतांनी विजयी झाले. * जागा ’2 ब’ (सर्वसाधारण महिला) मधून शिवसेनेच्या सावंत वैशाली सतिश 1507 मते मिळवून विजयी झाल्या आहेत. * प्रभाग क्रमांक 3: * जागा ’3 अ’ (अनुसूचित जाती महिला) मधून शिवसेनेच्या बनसोडे गोदाबाई भारत 826 मते मिळवून निवडून आल्या आहेत. * जागा ’3 ब’ (सर्वसाधारण) मधून शिवसेनेचे पाटील अरुण विलास 490 मते मिळवून विजयी झाले. * प्रभाग क्रमांक 4: * जागा ’4 अ’ (सर्वसाधारण महिला) मधून शिवसेनेच्या यावलकर आशादेवी सोमेश्वर 1600 मते मिळवून मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. * जागा ’4 ब’ (सर्वसाधारण) मधून शिवसेनेचे तेली ज्ञानेश्वर बाळकृष्ण 1237 मते मिळवून विजयी ठरले आहेत. * प्रभाग क्रमांक 5: * जागा ’5 अ’ (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग) मधून शिवसेनेचे गावडे काशिलिंग दगडू 1272 मतांनी विजयी झाले. * जागा ’5 ब’ (सर्वसाधारण महिला) मधून शिवसेनेच्या मेटकरी छाया सुर्यकांत 1418 मते मिळवून विजयी झाल्या आहेत. * प्रभाग क्रमांक 6: * जागा ’6 अ’ (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला) मधून शिवसेनेच्या सरगर सिमा समाधान 1177 मते मिळवून विजयी झाल्या आहेत. जागा ’6 ब’ (सर्वसाधारण) मधून शिवसेनेचे राऊत चैतन्य ज्ञानू 1198 मते मिळवून विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 7: * जागा 7 ’अ’ (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग): या जागेवर शहर विकास आघाडीचे उमेदवार बनकर गणेश शिवाजी 11 वॉर्डांच्या चुरशीत 1101 मते मिळवून विजयी झाले आहेत. * जागा 7 ’ब’ (सर्वसाधारण महिला): या प्रभागात फुले शोभा निवृत्ती या शहर विकास आघाडीच्या उमेदवाराने 926 मते मिळवत विजय संपादन केला. प्रभाग क्रमांक 8: * जागा 8 ’अ’ (अनुसूचित जाती महिला): शहर विकास आघाडीच्या उमेदवार साबळे श्रध्दा रवीप्रकाश यांनी 1016 मते मिळवून विजय संपादन केला आहे. * जागा 8 ’ब’ (सर्वसाधारण): अपक्ष उमेदवार जाधव रमेश पांडुरंग 1257 मते मिळवून निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक 9: * जागा 9 ’अ’ (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग): शहर विकास आघाडीचे उमेदवार मुजावर जुबेर इक्बाल यांनी 1152 मते मिळवत शिवसेनेच्या उमेदवारावर मात करून विजय मिळवला. * जागा 9 ’ब’ (सर्वसाधारण महिला): शिवसेनेच्या दौंडे दिव्यानी सौरभ 876 मते मिळवून विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक 10: * जागा 10 ’अ’ (सर्वसाधारण महिला): शहर विकास आघाडीचे उमेदवार झपके वैशाली सिध्दार्थ 1170 मते मिळवून विजयी झाल्या आहेत.

