Saturday, April 18, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

*सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज*

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
December 26, 2025
in political
0
*सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज*

सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ ची मतदान प्रक्रिया ०२ डि‌सेंबर रोजी पार पडली असून निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार मतमोजणी २१ डिसेंबर रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे होणार आहे. सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ नगराध्यक्ष पदासाठी व एकूण २१ सदस्य जागांसाठी ०२ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात ७७.७०% मतदान झाले. तसेच जागा क्र. १अ व ११अ साठी एकच नामनिर्देशनपत्र शिल्लक राहिल्याने सदर जागांकरीता मतदान प्रक्रिया पार पडली नाही. मतमोजणीकरिता एकूण ६४ अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे मतमोजणी प्रशिक्षण १८ डिसेंबर रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर येथे पार पडले. पोलीस प्रशासनामार्फत मतमोजणी बंदोबस्ताकरीता मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली असून मतमोजणी ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे‌. मतमोजणी प्रतिनिधी यांना ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश देण्यात येणार नसून मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल आणण्यास प्रतिबंध केला आहे. मतमोजणीकरीता प्रशासनातर्फे सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सैपन नदाफ यांनी दिली.

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

राजकीय व्यवस्थेने तापवलेले वातावरण थंड करण्यासाठीच एअर कंडिशनर – विश्वेश झपके

Next Post

सांगोल्यात ‘शिवसेनेचा भगवा’; नगराध्यक्षपदी आनंदा माने यांचा दणदणीत विजय!

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post
सांगोल्यात ‘शिवसेनेचा भगवा’; नगराध्यक्षपदी आनंदा माने यांचा दणदणीत विजय!

सांगोल्यात ‘शिवसेनेचा भगवा’; नगराध्यक्षपदी आनंदा माने यांचा दणदणीत विजय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697