डी बाटू विद्यापीठाचे कुलगुरु उद्या फॅबटेक मध्ये
सांगोला: प्रतिनिधीफॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयात 23 व 24 डिसेंबर 2025 रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय शोध निबंध परिषद होत असून या परिषदेसाठी लोणेरे (जि. रायगड) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाचे कुलगुरु कर्नल कारभारी काळे उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव डॉ. अमित रूपनर यांनी दिली.
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयाने स्वायत्ता दर्जा प्राप्त केला असुन या महाविद्यालयात उद्या मंगळवार दि. 23 व बुधवार दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ब्रेक थ्रू टेक्नॉलॉजीज फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. या परिषदेत लोणेरे (जि. रायगड) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल कारभारी काळे आणि तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, माजी संचालक डॉ. नवनाथ पासलकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय या परिषदेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंजिनिअर प्रविण कुमार पाल (नोकिया ऑफ अमेरिका), डॉ. अशोक रानडे (कॅनडा), डॉ. अजयकुमार मिश्रा (दक्षिण आफ्रिका), डॉ. राघवेंद्र गुप्ता (आय आय टी गुवाहाटी), डॉ. सयाजी म्हेञे (बीएआरसी मुंबई), डॉ. शिवाजी पवार (माजी कुलसचिव डी वाय पाटील कोल्हापूर विद्यापीठ), डॉ. अर्चना ठोसर (सीओईपी टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी पुणे), डॉ. पंकज आवटे (पी व्ही पी आय टी बुधगाव-सांगली), डॉ. प्रकाश बनसोडे (सांगोला महाविद्यालय, सोलापूर) आदी वक्ते सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत.
देशपातळीवरील संशोधनाची गरज लक्षात घेऊन फॅबटेक महाविद्यालयाने प्रथमच आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली असुन परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व प्राध्यापकांच्या शाश्वत विकासाचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. आंतरराष्ट्रीय परिषद मधुन नवनवीन संशोधकांना प्रेरणा मिळणार आहे. या परिषदेला बोर्ड ऑफ रिसर्च इन न्यूक्लिअर सायन्स कडून आर्थिक साहाय्य देण्यात आले असून या परिषदेत 150 हून अधिक संशोधन निबंधाचे सादरीकरण होणार आहे. फॅबटेक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी हि परिषद अतिशय फायदेशीर ठरणार आहे.
हि परिषद संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली असून परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. तुप्ती बनसोडे, प्रा. प्रियांका पावसकर सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी परीश्रम घेत आहेत

