सांगोला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे शिवणे येथे उत्साहात उद्घाटन
सांगोला/प्रतिनिधी:
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर संलग्नित सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे, सांगोला महाविद्यालय सांगोला व ग्रामपंचायत शिवणे तालुका सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरचे उद्घाटन मौजे शिवणे, ता. सांगोला, जि. सोलापूर येथे दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी उत्साहात पार पडले. सदरील श्रमसंस्कार शिबिर दिनांक 22 ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीत शिवणे गावात राबविण्यात येणार आहे.
या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.श्री. बाबुरावजी गायकवाड हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सूर्योदय फाउंडेशनचे सर्वेसर्वा मा.अनिल(भाऊ) इंगोले तसेच शिवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपाध्यक्ष मा.प्रकाशभाऊ वाघमोडे, शिवणे गावचे लोकनियुक्त सरपंच मा.दादासाहेब घाडगे, उपसरपंच सौ. प्रियांकाताई शेळके, ग्रामविकास अधिकारी श्री. पांडुरंग एकतपुरे, तसेच शिवणे गावच्या तलाठी मा.श्रीमती जयश्री कल्लाळे, शिवणे ग्रामपंचायतीचे सदस्य श्री. उदयसिंह घाडगे, सौ. कुसुम घाडगे, श्री. नामदेव जानकर, श्री. अंबादास भाटेकर, सौ. सुनीता घाडगे, श्री. संजय वलेकर, सौ. सुनीता इरकर, सौ. सौ.रंपाबाई ऐवळे यांच्यासह इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच एन.एस.एस. समिती सदस्य, प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.
शिवणे गावचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच मा.दादासाहेब घाडगे यांनी महाविद्यालयाने शिबिर आयोजित केल्यामुळे महाविद्यालयाच्या आभार मानले व या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, श्रमप्रतिष्ठा, स्वच्छता, ग्रामविकास व राष्ट्रसेवेची भावना निर्माण होईल, असे मत यावेळी व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास त्याचे परंपरा व महाविद्यालयाचे वाटचाल याविषयी आपले मनोगत व्यक्त केले तसेच मुलांना श्रमाचे महत्व समजावून सांगितल्या शिवणे हायस्कूलचे प्राचार्य विजयकुमार वाघमोडे, शिवणे यांनी ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आव्हान केले तसेच चांगल्या पद्धतीने शाश्वत काम करून घेण्याचे आव्हान केले याप्रसंगी हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थी, सांगोला महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिका, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी तसेच शिवणे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूर्योदय परिवाराचे सर्वेसर्वा अनिल(भाऊ इंगोले) यांनी महाविद्यालयाच्या विनंतीला मान देऊन 100 मोठी झाडे दान दिली या दिलेल्या वृक्षांचे लागवड करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सदाशिव देवकर यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. भाग्यश्री पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. रेणुकाचार्य खानापुरे यांनी मांडले.
