Wednesday, June 3, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

सांगोला नगरपरिषद हद्दीत एखतपूरोड भागाकरिता पाण्याची उंच नवीन टाकी बांधणे व पाणीपुरवठा करण्यासाठी रायझिंग मेन टाकणे ठराव जनरल मीटिंगमध्ये एकमताने मंजूर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
February 27, 2026
in sangola
0

सांगोला/ प्रतिनिधी :  

एखतपूर रोड परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सांगोला नगरपरिषदेकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या भागासाठी नवीन उंच पाण्याची टाकी बांधणे तसेच जलशुद्धीकरण केंद्रापासून टाकीपर्यंत रायझिंग मेन टाकण्याचा ठराव नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
नगरपरिषदेकडून १९९८ साली एखतपूर रोड परिसरात २ लाख लिटर क्षमतेची उंच पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. या टाकीतून पुजारवाडी, नवीन वसाहत, मस्के कॉलनी, बापू झंझे वसाहत, बनकर वस्ती, धोंडीराम जाधव वस्ती व धर्मा जाधव वस्ती या भागांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र गेल्या काही वर्षांत या परिसरात नवीन वसाहती मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून सध्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध पाण्याचा पुरवठा अपुरा ठरत आहे. परिणामी काही भागात कमी दाबाने पाणी येणे किंवा पाणी न मिळण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने, पाणीपुरवठा सभापती सौ. वैशाली सतीश सावंत, प्रभाग क्रमांक ६ च्या नगरसेविका व महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती सौ. सीमा समाधान सरगर तसेच नगरसेवक चैतन्य ज्ञानु राऊत यांनी हा विषय जनरल मीटिंगमध्ये मांडला. यास सर्व सदस्यांनी एकमताने पाठिंबा देत ठराव मंजूर केला.
सदर कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून अंदाजपत्रक व सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करून घेण्यात येणार आहे. त्यानंतर प्रशासकीय मान्यता मिळवून कामाला गती देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

या निर्णयामुळे एखतपूर रोड परिसरातील नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून, दीर्घकालीन पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

सांगोल्यात विकासाचा बिगुल! ५३ कामांना मंजुरी, स्व.आ.भाई गणपतराव देशमुख स्मारकासाठी तब्बल ३ कोटी

Next Post

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पश्‍चिम महाराष्ट्र सह संपर्कप्रमुख पदी सतीशभाऊ सावंत यांची निवड

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पश्‍चिम महाराष्ट्र सह संपर्कप्रमुख पदी सतीशभाऊ सावंत यांची निवड

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पश्‍चिम महाराष्ट्र सह संपर्कप्रमुख पदी सतीशभाऊ सावंत यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697