सांगोला / प्रतिनिधी 
या पत्रामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात 10 % राखीव खाटा उपलब्ध करून देणे निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णता मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया करणे संदर्भातील मार्गदर्शन करून सदैव तत्पर राहावे तसेच गंभीर व महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब रुग्णांना भरीव प्रमाणात आर्थिक सहाय्य व्हावे याकरिता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट, सर रतन टाटा ट्रस्ट यासारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी थेट बाळासाहेब भवन येथील मुख्य कार्यालयात संपर्क साधावा असेही पत्रात संस्थापक अध्यक्ष व कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांनी नमूद केले आहे निवडी नंतर सतीश भाऊ सावंत यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सतीशजी सावंत यांचे गोरगरिबांसाठी मोठे काम आहे जनतेसाठी अहोरात्र काम करणारा माणूस म्हणून दोन वेळा मतदारांनी त्यांच्या वर विश्वास टाकून निवडून दिले राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सतीशजी सावंत यांनी वैद्यकीय मदत कक्षा चे काम अतिशय चांगल्या प्रकारे करून गोरगरिबी रुग्णांना मदत करतील त्यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कक्षाने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पश्चिम महाराष्ट्राचे सहसंपर्क पदावर नेमणुक केली आहे.
– मंगेश चिवटे ओएसडी
शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सह संपर्कप्रमुख म्हणून राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब खासदार श्रीकांत शिंदे ओएसडी मंगेश चिवटे यांनी माझ्यावर जो विश्वास टाकून मला रुग्णांची सेवा करण्याची संधी दिली टाकलेल्या विश्वासास मी कायमच पात्र राहणार आहे या शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून रुग्णांना 24 तास मदत करून त्यांचे प्राण वाचवण्यासाठी कटिबद्ध आहे लवकरच शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या सांगोला तहसील कार्यालयासमोरील संपर्क कार्यालयात रुग्णांच्या मदतीसाठी 24 तास उपलब्ध राहुन रूग्णंना मदत करणार आहे.
– सतीशभाऊ सावंत
– सह संपर्कप्रमुख पश्चिम महाराष्ट्र शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष