सांगोला आठवडा बाजारात मोबाईल चोरीच्या घटनांत वाढ; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
सांगोला / प्रतिनिधी :
सांगोला शहरातील रविवार च्या आठवडा बाजार परिसरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये अलीकडे मोठया प्रमाणात वाढ होत असल्याचे समोर आले आहे. बाजारात मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरटे नागरिकांचे मोबाईल लंपास करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
सांगोला शहरातील व वाड्या वस्ती वरील लोक भाजीपाला, किराणा व इतर खरेदीसाठी सांगोला मध्ये येत असतात . आठवडा बाजारात भाजी खरेदी करताना तसेच गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणारे चोर नागरिकांचे मोबाईल चोरून तेथून पळ काढतात आठवडा बाजारातून २० ते २५ मोबाईल चोरी ला जातात या कडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे सदर बाजारात महिला व जेष्ठ नागरिक यांना चोरट्यांकडून लक्ष्य केले जात असल्याचे आढळून येत आहे . तसेच काही नागरिकांनी मोबाईल हरवल्यानंतर शोध घेतला असता तो सापडला नाही. मात्र अनेक वेळा गर्दीमुळे संशयित ओळखणे कठीण जात असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल करून ही मोबाईल मिळत नसल्याची खंत नागरिक करत आहेत. काही नागरिक तर आपला मोबाईल चोरी ला गेल्यावर तक्रार पण दाखल करत नाही काही नागरिक तर असे म्हणतात कि आठवडा बाजार मध्ये गेल्याला मोबाईल जर सदरच व्यक्ती जर पोलिसांच्या मर्जीतला असेल तर लगेच तक्रार करून मोबाईल चा तपास करत असतात नाही तर सर्वसामान्य लोकांना अर्ज देवून ही दोन दिवस तक्रार नोंदविण्यासाठी लागतात असे नागरीकामधून दबक्या आवाजात बोलले जात आहे सांगोला पोलीस स्टेशन मधील पी आय साहेबांनी या कडे लक्ष देवून आठवडा बाजारात फिरण्या चोरट्याचा बंदोबस्त करावा.

सदर आठवडा बाजार मध्ये मोबाईल चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे तक्रारदार आपली तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला गेला असता पोलीस कर्मचारी मोबाईल महागडा असेल तर त्या मोबाईलचे ट्रेस लागत नाही चोरटे हुशार आहेत सदरचा महागडा मोबाईल चे पार्ट बाजारात विकतात तक्रार देणाऱ्या व्यक्तीचे मनाचे खच्चीकरण होत आहे तरी आज पर्यंत जेवढे मोबाईलचे ला गेले त्याचा शोध लावून त्या व्यक्तीला मोबाईल परत द्यावा व आठवडा बाजारात सुरू होण्यापूर्वी व संपेपर्यंत पोलीस कर्मचारी नेमावा असे नागरिकांमधून बोलले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार,आठवडा बाजारामधून चोरी गेलेला मोबाईल आतापर्यंत 382 मोबाईलचा अद्याप पर्यंत ट्रेस लागलेला नाही
सॅमसंग S25 Ultra एका व्यक्तीने दहा दिवसापूर्वी एक लाख 25 हजार रुपये ला नवीन मोबाईल घेतला होता तो सांगोला आठवडा बाजारात भाजी खरेदी करता गेला असता त्याचा मोबाईल दिनांक 18 /01/26 रोजी चोरीला गेला आहे त्याची रितसर तक्रार दाखल केली असून आज अखेर मोबाइल मिळाला नाही
पोलीस प्रशासनाकडून बाजार परिसरात गस्त वाढविण्यात येत असून, संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, आठवडा बाजारात खरेदीसाठी येताना मोबाईल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, अनोळखी व्यक्तींच्या धक्काबुक्कीकडे दुर्लक्ष करू नये, तसेच मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे बाजारातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

