Saturday, April 18, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

सांगोला नगरपरिषदेकडून घरपट्टी पाणीपट्टी गाळा भाडे वसुलीसाठी विशेष मोहीम : मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
March 6, 2026
in sangola
0
सांगोला नगरपरिषदेकडून घरपट्टी पाणीपट्टी गाळा भाडे वसुलीसाठी विशेष मोहीम : मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी
सांगोला नगरपरिषदेकडून घरपट्टी पाणीपट्टी गाळा भाडे वसुलीसाठी विशेष मोहीम : मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी
सांगोला/प्रतिनिधी :
 
सांगोला नगरपरिषदे कडून घरपट्टी पाणीपट्टी गाळा भाडे वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम राबविण्यात आली असून नागरिकांनी आपली घरपट्टी पाणीपट्टी व गाळा भाडे भरून सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी केले आहे. नागरिकांनी घरपट्टी पाणीपट्टी व गाळा भाडे भरून सहकार्य करावे अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार आहे सन २०२५ २६ या आर्थिक वर्षासाठी सांगोला नगरपरिषदेची थकीत व चालू वर्षाची एकूण मालमत्ता कर मागणी ६५३.४५ लक्ष रुपये आहे. त्यापैकी २८ फेब्रुवारी २०२६ अखेर एकूण वसुली २८७.६८ लक्ष (४४%) एवढी झालेली आहे. पाणीपट्टी एकूण मागणी २८४.८२ लक्ष असून आज रोजीपर्यंत ९८.२१ लक्ष वसुली झालेली आहे.
 
दि. १ मार्चपासून शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता कर व पाणीपट्टी भरणा करण्यासाठी नगरपरिषद कार्यालय सुरू राहील. थकबाकी धारकाकडून घरपट्टी, पाणीपट्टी, गाळा भाडे वसुली वाढविण्यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांचे मार्गदर्शनाखाली ९ विशेष वसुली पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. सदर पथकामध्ये प्रियांका पाटील, कर निरीक्षक, रोहित गाडे, सचिन पाडे, कार्यालय अधीक्षक, महेश राजपूत, अस्मिता निकम, कर व प्रशासकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांचा समावेश आहे. सदर पथकांमार्फत घरोघरी जाऊन घरपट्टी, पाणीपट्टी वसुली करण्यासाठी भेटी देण्यात येत आहेत. सर्व मालमत्ताधारकांनी सुजाण नागरिक बनून आपल्या थकीत व चालू रकमेचा भरणा नगरपरिषद कार्यालयात करावा, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांनी केले आहे.
थकित मालमत्ता धारकांनी आपल्या थकीत व चालू रकमेच्या भरणा नगरपरिषद कार्यालयात न केल्यास अशा मालमत्ता धारकावर नळ कनेक्शन खंडित करणे, थकबाकीरांची नावे, वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे, झोन दाखला, जन्ममृत्यू प्रमाणपत्र न देणे, मालमत्ता जप्त करणे, गाळे सील करणे इत्यादी कडक कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी दिली
HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

सांगोला आठवडा बाजारात मोबाईल चोरीच्या घटनांत वाढ; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

Next Post

‘सांगली-परळी रेल्वेस जवळा स्थानकावर थांबा द्या’

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post
‘सांगली-परळी रेल्वेस जवळा स्थानकावर थांबा द्या’

'सांगली-परळी रेल्वेस जवळा स्थानकावर थांबा द्या'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697