Saturday, April 18, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

महिला दिनानिमित्त ‘मिस अँड मिसेस सांगोला-2026’ स्पर्धा जल्लोषात संपन्न

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
March 4, 2026
in sangola
0
महिला दिनानिमित्त ‘मिस अँड मिसेस सांगोला-2026’ स्पर्धा जल्लोषात संपन्न

सांगोला/प्रतिनिधी

महिला दिनाचे औचित्य साधत श्री चौडेश्‍वरी देवांग कोष्टी महिला मंच, सांगोला यांच्या वतीने आयोजित ‘मिस अँड मिसेस सांगोला-2026’ ही स्पर्धा मंगळवार दि. 3 मार्च 2026 रोजी दुपारी 12 वाजता अहिल्याबाई होळकर सभागृह (टाऊन हॉल), सांगोला येथे उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमास शहरातील महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या स्पर्धेला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. निकिताताई देशमुख उपस्थित होत्या. परीक्षक म्हणून सौ. सायली होगाडे व कु. लौकिता लालबेग यांनी स्पर्धकांचे परीक्षण केले. गेले तीन वर्षे हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून येथून पुढे अधिक मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम घेण्यात येईल, असे मंचाच्या अध्यक्षा यांनी यावेळी सांगितले.

स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी रु. 5000/- व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी रु. 3000/-, तृतीय क्रमांकासाठी रु. 2000/- व चतुर्थ क्रमांकासाठी रु. 1000/- तसेच सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. बेस्ट वेशभूषा, बेस्ट टॅलेंट आणि बेस्ट व्यक्तिमत्व या विशेष किताबांसाठी गिफ्ट हॅम्पर व सन्मानचिन्ह देण्यात आले. लकी ड्रॉद्वारे एकूण 10 आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

स्पर्धेतील विशेष किताब विजेत्यांमध्ये बेस्ट वेशभूषा – ऐश्‍वर्या बनकर, बेस्ट टॅलेंट – सौ. कल्याणी सपाटे, बेस्ट व्यक्तिमत्व – पुनम सावंत यांचा समावेश आहे. थर्ड रनरअप ललिता चौधरी, सेकंड रनरअप सौ. मयुरी कांबळे, फर्स्ट रनरअप सौ. स्मिता चव्हाण तर ‘मिस अँड मिसेस सांगोला-2026’ या स्पर्धेची विजेती कु. सेजल कवठेकर ठरली.

कार्यक्रमासाठी सूर्योदय परिवार, श्री चांडोले, श्री घोंगडे, ट्रॅक्टर्स टीव्हीएस, श्रुती कन्स्ट्रक्शन, अर्चना स्किन केअर क्लिनिक, श्री जी ज्वेलर्स आदींनी बक्षीस दाते म्हणून सहकार्य केले. परीक्षक सौ. सायली होगाडे व कु. लौकिता लालबेग यांचेही विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमस्थळी सौ. रेशमा दिवटे व सौ. रूपाली कुरकुटे यांनी साकारलेल्या सुंदर रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रांगोळी पाहण्यासाठी महिला वर्गाने मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूनम कांबळे, सौ. अश्‍विनी कांबळे, सौ. सविता लाटणे यांनी केले तर सौ. स्नेहा कुमठेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

डॉ. निकिताताई देशमुख यांनी आपल्या मनोगतात महिलांनी आपल्या आरोग्याची व शरीराची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करत आयोजकांचे आभार मानले. महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

दिमाखदार सोहळयाने सांगोला न्यायालयामध्ये ’’ विधीज्ञ कक्ष ’’ या नूतन इमारतीचे भूमिपूजन समारंभ संपन्न

Next Post

सांगोला आठवडा बाजारात मोबाईल चोरीच्या घटनांत वाढ; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post
सांगोला आठवडा बाजारात मोबाईल चोरीच्या घटनांत वाढ; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

सांगोला आठवडा बाजारात मोबाईल चोरीच्या घटनांत वाढ; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697