Saturday, April 18, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

दिमाखदार सोहळयाने सांगोला न्यायालयामध्ये ’’ विधीज्ञ कक्ष ’’ या नूतन इमारतीचे भूमिपूजन समारंभ संपन्न

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
March 4, 2026
in sangola
0
दिमाखदार सोहळयाने सांगोला न्यायालयामध्ये ’’ विधीज्ञ कक्ष ’’ या नूतन इमारतीचे भूमिपूजन समारंभ संपन्न

दिमाखदार सोहळयाने सांगोला न्यायालयामध्ये ’’ विधीज्ञ कक्ष ’’ या नूतन इमारतीचे भूमिपूजन समारंभ संपन्न

’’ विधीज्ञ कक्ष नूतन इमारत ही  न्यायालय, विधीज्ञ व पक्षकार यांचेमधील दुवा म्हणून भविष्यकाळामध्ये काम करणार ’’  –  मा. न्यायमूर्ती श्री. निजामोद्दीन जमादार साहेब
सांगोला /प्रतिनिधी

शनिवार, दिनांक 28.02.2026 रोजी दिवाणी न्यायालय, क. स्तर, सांगोला येथे विधीज्ञांकरीता नव्याने उभारण्यात येणा-या ’’ विधीज्ञ कक्ष ’’ या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ सोहळा मोठया उत्साहाने संपन्न झाला.

हा भूमिपूजन कार्यक्रम मा. न्यायमूर्ती श्री. निजामोद्दीन जमादार साहेब, उच्च न्यायालय, मुंबई यांचे शुभहस्ते तसेच मा. न्यायमूर्ती श्री. फिरदोश पुनीवाला साहेब, उच्च न्यायालय, मुंबई व मा. श्री. मनोज एस. शर्मा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब, सोलापूर तसेच अड मा.श्री.मिलिंद थोबडे, सदस्य, महाराष्ट्र आणि गोवा वकिल संघटना व विधीज्ञ संघ, सांगोला चे अध्यक्ष अड मा. श्री. एम.एन.ढाळे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या भूमिपूजन सोहळयाची सुरुवात उपस्थित मान्यवरांचे औक्षण करुन पारंपारीक पध्दतीने हलगी व तुतारीच्या निनादामध्ये करणेत आले. त्यानंतर मान्यवरांचे मुख्य व्यासपिठावर आगमन झाले. मान्यवरांचे स्वागत हे सांगोला विद्यामंदीर प्रशाला, सांगोला येथील इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेणा-या बालचमुंच्या सुंदर आवाजामध्ये स्वागतगिताने करणेत आले. त्यानंतर सर्व मान्यवर यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे प्रास्तावीक करताना विधीज्ञ संघ, सांगोला चे अध्यक्ष अड मा.  श्री. एम.एन.ढाळे यांनी सांगोला न्यायालयातील सध्यस्थितीचे कामकाज तसेच सांगोला तालुक्याकरीता गतिमान न्यायव्यवस्था होणेकरीता आणखी न्यायालयांची आवश्यकता असलेचे नमूद केले.

या कार्यक्रमामध्ये आपले विचार व्यक्त करताना अड मा.श्री.मिलिंद थोबडे, सदस्य, महाराष्ट्र आणि गोवा वकिल संघटना यांनी विधीज्ञ संघ, सांगोला यांचेमार्फत  आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करणेत आला.

या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी मा. न्यायमूर्ती श्री. फिरदोश पुनीवाला साहेब, उच्च न्यायालय, मुंबई यांनी आपले मनोगत व्यक्त करताना न्यायव्यवस्थेमध्ये पक्षकार हा केंद्रबिंदू मानून न्यायव्यवस्थेतील सर्व घटकांनी तसेच विधीज्ञ यांनी काम करावे असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी  मा. न्यायमूर्ती श्री. निजामोद्दीन जमादार साहेब, उच्च न्यायालय, मुंबई यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नव्याने उभारण्यात येणारी ’’ विधीज्ञ कक्ष ’’ ही नूतन इमारत न्यायालय, विधीज्ञ व पक्षकार यांचेमधील दुवा म्हणून भविष्यकाळामध्ये काम करणार आहे असू नमूद केले. भविष्यकालीन न्यायव्यवस्थेतील उपाययोजनांचा भाग म्हणून ही इमारत उभारण्यात येणार आहे. न्यायव्यवस्था अधिक जलद व गतिमान करणेसाठी न्यायालयाशी संबंधीत प्रत्येक घटकाने आपले योगदान देणे महत्वाचे असलेबाबत नमूद केले.

या दिमाखदार सोहळयाचे सुत्रसंचालन दिवाणी न्यायालय,सांगोलाचे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती ए. ए. पाटील साो व विधीज्ञ संघाचे सदस्य अड मा. श्री. गजानन एल. भाकरे यांनी केले.

या सोहळयाचे आभार प्रदर्शन सांगोला विधीज्ञ संघाचे जेष्ठ सदस्य अड मा. श्री उदय शि. घोंगडे यांनी केले.

या भूमिपूजन सोहळयाकरीता सोलापूर जिल्हयातील बहूतांश न्यायाधीश, सांगोला तालुका व परिसरातील सर्व विधीज्ञ, नागरिक व पक्षकार तसेच जिल्हा न्यायालय सोलापूर व सांगोला न्यायालयातील न्यायालयीन कर्मचारी यांनी मोठया संख्येने उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करणेकरीता दिवाणी न्यायाधीश श्रीमती पी.आर.कुलकर्णी साो, दिवाणी न्यायालय, सांगोला, सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती ए.ए.पाटील साो. दिवाणी न्यायालय, सांगोला, 2 रे दिवाणी न्यायाधीश श्री. एस.एस.साळुंखे साो, दिवाणी न्यायालय, सांगोला यांचे मार्गदर्शनाखाली, सांगोला न्यायालयाचे सर्व कर्मचारी व विधीज्ञ संघ, सांगोलाचे अध्यक्ष अड मा. श्री. एम.एन.ढाळे तसेच विधीज्ञ संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी कठोर परिश्रम घेतले.

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Tags: Bar Concil
Previous Post

वाळू माफियांची मुजोरी वाढली तहसिलदारांच्या गाडीवर दगडफेक ” गाडीच्या फोडल्या काचा

Next Post

महिला दिनानिमित्त ‘मिस अँड मिसेस सांगोला-2026’ स्पर्धा जल्लोषात संपन्न

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post
महिला दिनानिमित्त ‘मिस अँड मिसेस सांगोला-2026’ स्पर्धा जल्लोषात संपन्न

महिला दिनानिमित्त ‘मिस अँड मिसेस सांगोला-2026’ स्पर्धा जल्लोषात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697