सांगोला /प्रतिनिधी
सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, नगराध्यक्ष पदासाठी विकासाभिमुख दृष्टिकोन असणारे उद्योगपती श्री. विश्वेश झपके यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. कमी कालावधीत व कमी वयात सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात आपला ठसा उमटवलेले श्री. विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके हे शहरातील लोकप्रिय व कार्यक्षम व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात असून त्यांच्या स्वच्छ प्रतिमेने आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे ते राजकारणात एक नवा पर्याय म्हणून पुढे येत आहे.

सांगोला नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना अक्षरशः वेग आला आहे. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांची गणिते कोलमडली आहेत. कारण यावेळी पुन्हा एकदा नागरिकांचा मागास प्रवर्ग अशी सोडत निघाल्याने अनेक पक्षांना योग्य उमेदवार शोधण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक नवा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला असून उद्योगपती श्री. विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

श्री. विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके यांचा प्रवेश हा सांगोल्याच्या राजकारणात अनपेक्षित पण प्रभावी असा ठरणार आहे. शहरातील राजकीय समीकरणे आता पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत आता. “झपके फॅक्टर” निर्णायक ठरण्याची शक्यता ठरणार असून विश्वेश झपके यांची ही वाइल्ड कार्ड एन्ट्री सध्याच्या राजकीय समीकरणांना नवा वेग देणारी ठरत आहे.

सांगोला शहरासह तालुक्यात झपके घराण्याचे वेगळे स्थान आहे. थेट राजकारणात नसतानाही हे कुटुंब समाजकार्यात सक्रिय राहिले आहे. विविध सामाजिक उपक्रम, उत्सव आणि लोककल्याणासाठी त्यांनी सदैव पुढाकार घेतला आहे. श्री. विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके यांच्या सर्व समाजातील लोकप्रियतेचा विचार करून त्यांना वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

श्री. विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमधून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोच साधली असून, तरुण वर्गामध्ये त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. शैक्षणिक, उद्योग क्षेत्रातील अनुभव आणि नागरिकांसाठीची त्यांची बांधिलकी पाहता नगराध्यक्ष पदासाठी त्यांचे नाव पुढे येणे स्वाभाविक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
श्री. विश्वेश झपके हे माजी नगराध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके यांचे चिरंजीव आहेत. प्रा. प्रबुद्धचंद्र झपके हे सर्वपक्षीय संबंध जपणारे आणि समाजहिताचे कार्य करणारे म्हणून ओळखले जातात. त्या वारशातून प्रेरणा घेत, विश्वेश झपके यांनीही संवाद, समन्वय आणि सर्वांसाठी विकास हे आपले ध्येय ठेवले आहे. प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या सर्वपक्षीय संपर्कामुळे श्री. विश्वेश झपके यांच्या उमेदवारीला व्यापक पाठिंबा मिळू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, सांगोला शहरातील प्रमुख राजकीय पक्ष व स्थानिक गट त्यांच्या संपर्कात असून श्री. विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके हे कोणत्या पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सांगोला शहरात त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने सांगोल्याच्या निवडणूक समीकरणांमध्ये नव्या घडामोडींना वेग आला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *