
सांगोला /प्रतिनिधी
कोळा जिल्हा परिषद गटातील अत्यंत महत्त्वाचे गाव मानल्या जाणाऱ्या जुजारपूर गुणापवाडी येथील शेकडो कार्यकर्ते विकासाभिमुख नेतृत्व असणाऱ्या माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गटात प्रवेश करत आहेत. सोमवार दि १० नोव्हेंबर रोजी गुणापवाडी येथील श्री हनुमान मंदिराच्या समोर हा प्रवेश कार्यक्रम संपन्न होणार आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक तोंडावर असताना हा प्रवेश राजकीय वर्तुळात महत्त्वाचा मानला जात आहे. गुणापवाडी येथील प्रकाश वाघमोडे, दत्ता माने, सचिन माने, गुलाब माने, गजेंद्र काळे, बंडू वाघमोडे, दादू माने, गणेश वाघमोडे, डॉ. समाधान माने, दिनकर माने, तानाजी यमगर, राजेंद्र गोयकर, समाधान श्री वाघमोडे, दत्तात्रय बामणे, रंगनाथ माने, बंडू गोयकर आदी प्रमुख स्थानिक नेतेमंडळींसह शेकडो कार्यकर्ते सोमवारी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गटात प्रवेश करणार आहेत तरी कोळा जिल्हा परिषद गटातील दिपकआबांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांनी सोमवार १० नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या या पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन गुनापवाडी ग्रामस्थांनी केले आहे.
ज्यावेळी आम्ही गावातील सार्वजनिक कामानिमित्त दिपकआबाकडे गेलो त्या प्रत्येकवेळी त्यांनी आमची कामे मार्गी लावली. सांगोला तालुक्याला जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विकासाचा ध्यास घेतलेल्या दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाची गरज आहे. म्हणूनच आम्ही सर्वानुमते विकासाला प्राधान्य देणाऱ्या साळुंखे पाटील यांच्या परिवारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
-श्री प्रकाश वाघमोडे,
-गुणापवाडी, ता सांगोला.
