सांगोला प्रतिनिधी –
सांगोला नगरपालिका निवडणूक 2025 साठी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी 10 नोव्हेंबर रोजी एकही उमेदवारी अर्ज विक्री व दाखल झाला नाही. सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधील निवडणुकीच्या दृष्टीने युतीचा निर्णय अद्याप झाला नाही. माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील हे कोणत्या पक्षाशी युती करणार यावरती नगरपालिका निवडणुकीचे यश- अपयश अवलंबून राहणार आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांची रसिखेच चालू असून अद्याप युतीचा निर्णय झाला नसल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये ही संभ्रम आहे. नगरपालिका निवडणूक अतिशय चुरशीची व अटीतटीची होणार असून या निवडणुकीत कोणाला बहुमत मिळणार ?कोण नगराध्यक्ष होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

