सांगोल्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार संतोषजी कणसे यांचे उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नतीझाली असून सांगोला तालुक्यातील त्यांच्या पदोन्नतीची बातमी समजताच आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे , महसूल विभागाकडून 2025 – 26 या वर्षासाठी तहसीलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्याच्या अनुषंगाने ही निवड करण्यात आली

असून राज्यातील 112 अधिकार्‍यांमध्ये सांगोल्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार संतोष कणसे यांचाही समावेश आहे .तहसीलदार संतोष कणसे यांनी गेल्या दोन वर्षात सांगोला तालुक्यात अत्यंत प्रामाणिकपणे, सचोटीने आणि जनभावनांना अनुसरून कामकाज केले आहे. कोणतीही समस्या असो अथवा रस्त्याच्या तक्रारीपासून ते नागरिकांच्या शासकीय कामापर्यंत त्यांनी समंजसमंजस्याने आणि पारदर्शकतेने उपाय शोधणे हा दृष्टिकोन कायम ठेवला

आहेविधानसभा निवडणूक असो वा सध्या सुरू असलेली नगरपालिका निवडणूक असो प्रत्येक वेळी त्यांनी इच्छुक अचूक नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्थापन,आणि तणावमुक्त अंमलबजावणी यामुळे प्रशासनाचे तसेच जनतेचे मन जिंकले.त्यांच्या नेतृत्वाखाली सांगोल्यातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणी अनुकरणीय ठरली आहे .

HTML img Tag Simply Easy Learning    

संतोषजी कणसे यांच्या पदोन्नतीमुळे सांगोला तालुक्यातील जनतेचा अभिमानाची भावना व्यक्त होत असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षा होत आहे. प्रामाणिकपणा,कर्तव्यनिष्ठा आणि लोकाभिमुख प्रशासनाची सांगोला तहसील कार्यालयातील ओळख निर्माण करणाऱ्या संतोष कणसे यांची उपजिल्हाधिकारी पदावर झालेले बडती हे सांगोल्यासाठी गौरवाची बाब ठरली आहे.

 

HTML img Tag Simply Easy Learning    

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *