Monday, March 2, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

सह्याद्री फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये यश

संपादक by संपादक
February 10, 2026
in sangola
0

सांगोला / प्रतिनिधी

सह्याद्री फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी, कै.लक्ष्मीबाई फडतरे कॉलेज ऑफ फार्मसी,कळंब, इंदापूर व लँगबसटेक युनिव्हर्सिटी न्यू जर्सी,अमेरिका,आफ्रिका आशिया स्कॉलर्स ग्लोबल नेटवर्क लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने “इंटरनॅशनल समिट ऑन फ्युचर रेडी फार्मसी ,इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट सायन्स” या विषयावर आयोजलेल्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेऊन कु.सना जमादार या विद्यार्थिनीच्या सादरीकरणाने तृतीय क्रमांक पटकावला. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा अनिता दिलीपकुमार इंगवले, प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांनी विजेत्या कु.सना जमादार हिचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून उज्वल भविष्याच्या शुभेछया दिल्या. एम.फार्मसी द्वितीय वर्षाचे विद्यार्थी सना जमादार,वृषाली सरतापे,अनुप कुंभार,आकांक्षा झाडबुके तसेच एम.फार्मसी प्रथम वर्षाचे श्रुती देशमुख, चव्हाण शुभांगी, पुजारी सानिका, खताळ शीतल या विद्यार्थ्यांनी केमिकल मॉलिक्युलर डॉकिंग व फायटोकेमिकॅल स्टडी अँड हर्बल टॅबलेट या विषयावर आपले सादरीकरण करून या आंतरराष्ट्रीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत सहभाग घेऊन त्याबद्दल सम्पूर्ण माहिती परीक्षकांना दिली.विद्यार्थ्यांनी बनवलेले पोस्टर व माहिती सादरीकरण याचे परीक्षकांनी विशेष कौतुक करून, त्रितिय क्रमांकाने सन्मानित केले. या यशस्वी विद्यार्थ्यांना डॉ.ए.एम.तांबोळी, डॉ.एन.ए.तांबोळी यांनी मार्गदर्शन केले.

Previous Post

राजकारणात मी सत्तेचा हव्यास कधी केला नाही : माजी आमदार शहाजीबापू पाटील

Next Post

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने

संपादक

संपादक

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697