Wednesday, June 3, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

सांगोला नगरपरिषद अंतर्गत जनगणना 2026-27 च्या पार्शवभूमीवर प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण संपन्न

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
April 29, 2026
in sangola
0
सांगोला नगरपरिषद अंतर्गत जनगणना 2026-27 च्या पार्शवभूमीवर प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण संपन्न

सांगोला नगरपरिषद अंतर्गत जनगणना 2026-27 च्या पार्शवभूमीवर प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण संपन्न
सांगोला / प्रतिनिधी

केंद्र शासनाने जनगणना 2026-27 ची घोषणा केली असून प्रथम टप्प्यांमध्ये घरयादी जनगणना ही दिनांक 16 मे ते 14 जून या दरम्यान करण्यात येणार आहे. याकरिता जनगणना सुरळीत पार पाडण्यासाठी सांगोला नगरपरिषदेने दिनांक 27 एप्रिल ते 29 एप्रिल या दरम्यान प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह या ठिकाणी आयोजित केले होते. सदर प्रशिक्षणामध्ये सर्व 84 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सदरच्या प्रशिक्षणामध्ये जनगणना मोबाईल ॲपच्या माध्यमातून कशा पद्धतीने करावयाचे आहे याबद्दल सविस्तर असे प्रशिक्षण देण्यात आले.
यामध्ये 65 घरयादी गट नगर परिषदेच्या माध्यमातून तयार करण्यात आले असून प्रत्येक गटांमध्ये एक प्रगणक जनगणना करणार आहे. या प्रगणकांना तांत्रिक मदत करण्यासाठी ६ प्रगणक यावर एक सुपरवायझर यांचे नेमणूक करण्यात आली आहे. या प्रशिक्षणामध्ये पहिल्या दिवशी जनगणना ओळख व जनगणना पार्श्वभूमी संदर्भित व्याख्या, घरयादी नकाशा, मोबाईल ॲपचा वापर इ. संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. दुसऱ्या दिवशी नागरिकांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची माहिती व पद्धत याबाबतचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. व तिसऱ्या दिवशी सर्व प्रगणक व सुपरवायझर यांना प्रत्यक्ष घरांची गणना कशा पद्धतीने करावयाची याबाबत प्रगणक व सुपरवायझर यांच्याकडून प्रायोगिक स्वरुपात शहरातील विविध भागातील घरांची जनगणना करण्यात आली.
यावेळी जनगणना चार्ज ऑफिसर तथा मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, ॲडिशनल चार्ज ऑफिसर श्री सचिन पाडे, फिल्ड ट्रेनर श्री प्रभाकर कांबळे व श्री योगेश गंगाधरे यांनी प्रगणक व सुपरवायझर यांना प्रशिक्षण दिले.

यंदाची जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे जनगणना डिजिटल पद्धतीने करण्यात येत आहे. त्याचबरोबर स्वगणनाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला आपल्या कुटुंबाची जनगणना स्वतः करता येणार आहे. यासाठी नागरिकांना दि. 1 मे ते दि. 15 मे च्या मध्यरात्री पर्यंत http://se.census.gov.in या वेबसाईटच्या माध्यमातून स्वगणना करता येईल. जणगणनेसाठी प्रगणक दि. 16 मे ते 14 जून यादरम्यान आपल्या घरी येऊन माहिती घेईल. यावेळी नागरिकांनी स्वगणना केली असल्यास प्राप्त स्वगणना आय-डी प्रगणकास देऊन सहकार्य करावे.
*डॉ. सुधीर गवळी
जनगणना चार्ज ऑफिसर तथा मुख्याधिकारी
नगरपरिषद सांगोला.*

 

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली – कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ एस. कार्तिकेयन सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी

Next Post

लायन्स क्लब ऑफ सांगोला च्या अध्यक्षपदी ला.प्रशांत रायचुरे यांची निवड; सचिवपदी ला.प्रा.प्रसाद खडतरे तर खजिनदारपदी ला. प्रा.निलेश नागणे

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post
लायन्स क्लब ऑफ सांगोला च्या अध्यक्षपदी ला.प्रशांत रायचुरे यांची निवड; सचिवपदी ला.प्रा.प्रसाद खडतरे तर खजिनदारपदी ला. प्रा.निलेश नागणे

लायन्स क्लब ऑफ सांगोला च्या अध्यक्षपदी ला.प्रशांत रायचुरे यांची निवड; सचिवपदी ला.प्रा.प्रसाद खडतरे तर खजिनदारपदी ला. प्रा.निलेश नागणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697