Tuesday, October 27, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

सांगोले नगरपरिषदेचे सन 2026-27 साठीची अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभा संपन्न

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
February 16, 2026
in sangola
0

सांगोला/प्रतिनिधी ः 

 

सांगोले नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये दि.16/02/2026 रोजी अर्थसंकल्पीय मा. विशेष सर्वसाधारण सभा संपन्न होवून नगरपरिषदेचे सन 2025-26 या आर्थिक वर्षाच्या सुधारीत व सन 2026-27 च्या प्रस्तावित अर्थसंकल्पास सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली. मा. मुख्याधिकारी यांनी तयार केलला व मा. स्थायी समितीने सुचविलेल्या दुरुस्त्या व शिफारशीसह अर्थसंकल्प मा. विशेष सर्वसाधारण सभेसमोर सादर करण्यात आला. मा. विशेष सर्वसाधारण सभेसमोर नगराध्यक्ष मा. श्री. आनंदा गोरख माने यांच्यावतीने नगरपरिषदेचे लेखापाल श्री.हरीभाऊ काळे व लेखापरिक्षक श्री. लहु लेंगरे यांनी अर्थसंकल्प सादर केला. सदर अर्थसंकल्पामध्ये जमा बाजूस आरंभीच्या शिल्लकेसह महसुली जमा व शासन अनुदाने अशी एकुण रक्कम रु. 229,79,74,539/- इतकी जमा दर्शविण्यात आली आहे, खर्च बाजूस महसुली व शासन अनुदानामधुन खर्च रक्कम रु, 229,78,23,740/- इतकी दर्शविण्यात आली आहे व अखेर शिल्लक रक्कम रु. 1,50,799/- इतकी दर्शविणेत आलेली आहे.

सभागृहामध्ये सन 2026-27 च्या अर्थसंकल्पास सर्वानुमते मंजुरी प्रदान करणेत आली आहे. अर्थसंकल्पामध्ये नगरोत्थान अभियान राज्यस्तर (भुयारी गटार योजना), अधिसुचित विशिष्ठ नागरी सेवा सुविधा पुरविणेसाठी अनुदान, नगरोत्थान अभियान जिल्हास्तर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना, दलितेत्तर योजना, वैशिष्ट्यपुण्र् योजना, विशेष वैशिष्ट्यपुर्ण योजना, विशेष रस्ता अनुदान, अल्पसंख्यांक बहूल क्षेत्र विकास योजना, रमाई आवास घरकुल योजना, शाश्‍वत विकास धोरण, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, इत्यादी कामी तरतुद करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे शहरातील बगीचे, इमारतीं बांधकाम, स्मशान भुमी/ दफनभुमी सुधारणा, नविन रस्ते व शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, नविन पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन, आवश्यक विद्युत व्यवस्था, नागरीकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळणेसाठी पाणीशुध्दीकरण यंत्रणा बसविणेसाठी तरतुद करण्यात आली आहे. तसेच महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण व दुर्बल घटकांसाठी विधिवत तरतुद करण्यात आली आहे. शहरामध्ये राष्ट्र पुरुषांचे व समाज सुधारकांचे पुतळे सुशोभिकरण करणे कामी अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतुद करण्यात आली आहे. नगरपरिषदेस नगरोत्थान अभियान राज्यस्तर (भुयारी गटार योजना) अनुदान मंजुर असून सदर मंजुर अनुदानामधून सांगोला शहरातील सांडपाण्याची शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया केल्याने पर्यावरण सुधारण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शहरामध्ये पर्यावरण पुरक उपक्रम जोपासला जात आहे.

सभेस अध्यक्ष मा. श्री. आनंदा गोरख माने, उपाध्यक्ष मा. श्री. नितीन विठ्ठल इंगोले, मुख्याधिकारी डॉ. श्री. सुधीर गवळी, सर्व विषय समित्यांचे सभापती व सर्व नगरसेवक, विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

डॉ. श्री. सुधीर गवळी,

मुख्याधिकारी

नगरपरिषद सांगोले

सांगोला शहराच्या प्रगतीला नवी गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आज दि. 16-02-2026 रोजी नगरपरिषदेचा सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा सुधारीत अर्थसंकल्प आणि सन 2026-27 या वित्तीय वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सर्वानुमते मंजुर करण्यात आला आहे. शिक्षण, आरोग्य,रस्ते, पाणीपुरवठा आणि पर्यावरण या सोबतच विद्यार्थी , युवक, महिला, जेष्ठ मंडळी व दिव्यांग बांधवासाठी विशेष तरतुदींचा या अर्थसंकल्पात समावेश आहे. चला, समृध्द आणि स्मार्ट सांगोलेच्या निर्मीतीत सहभागी होऊया

नियोजन सांगोलेच्या शाश्‍वत विकासाचे

श्री. आनंदा माने

नगराध्यक्ष

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने

Next Post

सांगोला नगर परिषदेमार्फत व महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post

सांगोला नगर परिषदेमार्फत व महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
September 29, 2026
0

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न बहिर्जी नाईक समाधीस्थळ व शुक्राचार्य देवस्थान दर्शन; ऐतिहासिक, धार्मिक...

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा – मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा – मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा - मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपा सोलापूर ग्रामीणच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान 2026...

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख महोत्सवात भव्य नोकरी भरती मेळाव्याचे...

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान*

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान*

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान* सांगोला (प्रतिनिधी) रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समजून २३ मे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक...

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 22, 2026
0

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल     सांगोला/प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील तहसील कार्यालयात शासकीय कामकाजात अडथळा...

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान 

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान 

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 21, 2026
0

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान  सांगोला /प्रतिनिधी  सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष,...

*मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव*

*मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव*

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 17, 2026
0

  *मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव* *चावीमनला पकडून ठेवत बळजबरीने पाणी सोडल्याचा आरोप** सांगोला : प्रतिनिधी शहरातील मस्के कॉलनी परिसरात...

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 15, 2026
0

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन; मानवतेच्या सेवेचे २३ वे वर्ष सांगोला (प्रतिनिधी): सांगोले...

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपट देशमुख यांचे दुःखद निधन

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपट देशमुख यांचे दुःखद निधन

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 12, 2026
0

सांगोला  :प्रतिनिधी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील तथा विक्रमवीर आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र...

Load More

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697