Saturday, April 18, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

सांगोला नगर परिषदेमार्फत व महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
February 22, 2026
in sangola
0

सांगोला प्रतिनिधी –

‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ व ‘माझी वसुंधरा ६.०’ अभियानांतर्गत दरवर्षीप्रमाणे दि. ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांगोला नगर परिषदेमार्फत विविध स्पर्धा तसेच होममिनिस्टर – खेळ पैठणीचा, यासारख्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वा. महिलांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता *पाककला स्पर्धा* तसेच दुपारी २.०० वाजता *ग्रुप डान्स स्पर्धेचे* आयोजन करण्यात आलेले आहे. पाक कला स्पर्धेचा विषय *मूग व हुलगा यापासून बनवलेल्या चविष्ट ,पौष्टिक, रुचकर पदार्थ* तसेच पाक कलेतील स्पर्धेतील प्रत्येकी पहिल्या तीन क्रमांकांना रक्कम रुपये ५००१ ,३००१, २००१ प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह.  ग्रुप डान्स स्पर्धेचा विषय *भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब /सामाजिक संदेश* ग्रुप डान्स स्पर्धेतील प्रत्येकी पहिल्या तीन क्रमांकांना  रक्कम रुपये ७००१,५००१, ३००१  प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह तसेच उत्तेजनार्थ बक्षीसही दिले जाणार आहेत. दि. ९ मार्च २०२६ रोजी ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’, लकी ड्रॉ व बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन दुपारी १२ वा.  करण्यात आले आहे. वरील सर्व कार्यक्रम *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन ( टाऊन हॉल )* येथे होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दि. ६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत 7972100365, 7709092241 या नंबर वर नाव नोंदणी करावी. तरी सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन सहभाग नोंदवावा असे आवाहन सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. छायाताई मेटकरी व लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. आनंदाभाऊ माने यांनी केले आहे.

Screenshot
HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

सांगोले नगरपरिषदेचे सन 2026-27 साठीची अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभा संपन्न

Next Post

वाढेगांव येथील नदीत सापडला १२ किलो वजनाचा चंदेरी मासा

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post

वाढेगांव येथील नदीत सापडला १२ किलो वजनाचा चंदेरी मासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697