Saturday, April 18, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

वाढेगांव येथील नदीत सापडला १२ किलो वजनाचा चंदेरी मासा

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
February 22, 2026
in sangola
0

सांगोला / प्रतिनिधी

वाढेगांव – वाढेगांव ता. सांगोला येथील को. प. बंधाऱ्याच्या नदीपात्रातील पाण्यामध्ये चंदेरी जातीचा १२ किलो वजनाचा मासा सापडला आहे. हा मासा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. वाढेगांव येथे माण, कोरडा व अफ्रुका या तीन नद्या असून जिथे या नद्या मिळतात, तिथे को. प. बंधारा आहे. तेथील पात्र खोल व रुंद आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने उन्हाळ्यातच नदीला पाणी आले होते. येणारे पाणी हे दूरवरून आल्याने नदीपात्रात मासेही मोठ्या प्रमाणात आले होते. नदीपात्र स्वच्छ असल्याने या ठिकाणी रव, गासकापर, निरगील, कटला, सपरनेस, गुगळी, कटरना, चिलाप इ. विविध जातीचे मासे नदीपात्रात आढळतात. सद्या नदीपत्रातील पाणी पातळी कमी होत चालली असल्याने मोठ-मोठे मासे पहावयास मिळत आहेत. अशातच शुक्रवारी सकाळी नदीपत्रातील जाळी काढत असताना मोठ्या वजनाचा मासा जाळीत अडकल्याचे लक्षात येताच मासेमारी करणाऱ्यांनी हा मासा नदीपात्रातून बाहेर काढला.  मासेमारी करणारे रोज सकाळी-सायंकाळी जाळीद्वारे मासे काढून विक्रीसाठी ठेवतात. ताजे मासे घेण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत असते. मासेमारीच्या छोट्या व्यवसायातून उदरनिर्वाह होत असल्याने मासे व्यवसाईकतून समाधान व्यक्त होत आहे. चंदेरी जातीचा एवढ्या मोठ्या वजनाचा मासा पहिल्यांदाच नदीपात्रात सापडला असल्याचे मच्छीमाऱ्याकडून सांगण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

सांगोला नगर परिषदेमार्फत व महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

धनश्री पवारच्या जिद्दीला सलाम वडिलांचे प्रेत घरात असताना दिला दहावीचा पेपर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post

धनश्री पवारच्या जिद्दीला सलाम वडिलांचे प्रेत घरात असताना दिला दहावीचा पेपर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697