Tuesday, October 27, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

धनश्री पवारच्या जिद्दीला सलाम वडिलांचे प्रेत घरात असताना दिला दहावीचा पेपर

शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची तत्परता

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
February 22, 2026
in solapur
0

 

 

 

धनश्री पवारच्या जिद्दीला सलाम
वडिलांचे प्रेत घरात असताना दिला दहावीचा पेपर

 

 

 

 

 

सोलापूर /प्रतिनिधी

सोलापूर येथील शरदचंद्र पवार प्रशाला या शाळेमध्ये धनश्री भिकाजी पवार ही विद्यार्थिनी इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहे. शुक्रवारी दहावीचा मराठीचा पहिला पेपर होता. धनश्रीने चांगला अभ्यास केलेला परंतु तिचे वडील भिकाजी पवार यांचे सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. घरातील सर्व सदस्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अंत्यविधीसाठी नातेवाईक, शेजारी जमा होत होते.
धनश्रीचा पहिलाच पेपर बुडणार आणि तिच्याबद्दल तिच्या वडिलांनी पाहिलेले स्वप्न वाया जाणार म्हणून शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक अस्वस्थ होते.

प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी धनश्रीच्या घरी जाऊन नातेवाईक व धनश्रीच्या आईला, भावाला समजावून सांगून दोन तास अंत्यविधी पुढे ढकलायला सांगितले. धनश्रीला धीर दिला आणि तिला तयार करून स्वतः परीक्षा केंद्रावर नेऊन परीक्षेला बसविले.
पूर्ण तीन तास पेपरला बसणे तिला शक्य नव्हते, म्हणून अंत्यविधीसाठी अर्ध्यातून घेऊन जाण्यासाठी शिक्षणाधिकारी सचिन जगताप साहेब यांना कॉल करून सांगितले. शिक्षणाधिकारी यांनी सुद्धा प्रसंग पाहून केंद्रप्रमुख श्रीमती गीता सादुल यांना तिला अर्ध्यातून सोडण्याविषयी सांगितले. शिक्षणाधिकारी जगताप यांनी स्वतः परीक्षा केंद्रावर येऊन धनश्रीला धीर दिला . दीड तास पेपर लिहिल्यानंतर पुन्हा मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तिला संतोष लोंढे या सेवकाच्या गाडीवर अंत्यविधीला आणले.

धनश्रीच्या या धैर्यामुळे नातेवाईक, शेजारी, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक या सर्वांचेच डोळे पाणावले.

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

वाढेगांव येथील नदीत सापडला १२ किलो वजनाचा चंदेरी मासा

Next Post

डॉ.शीतल अजळकर सांगोला-पंढरपूर परिसरात नवजात अतिदक्षता सेवा लवकरच सुरू करणार

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post

डॉ.शीतल अजळकर सांगोला-पंढरपूर परिसरात नवजात अतिदक्षता सेवा लवकरच सुरू करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
September 29, 2026
0

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न बहिर्जी नाईक समाधीस्थळ व शुक्राचार्य देवस्थान दर्शन; ऐतिहासिक, धार्मिक...

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा – मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा – मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा - मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपा सोलापूर ग्रामीणच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान 2026...

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख महोत्सवात भव्य नोकरी भरती मेळाव्याचे...

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान*

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान*

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान* सांगोला (प्रतिनिधी) रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समजून २३ मे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक...

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 22, 2026
0

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल     सांगोला/प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील तहसील कार्यालयात शासकीय कामकाजात अडथळा...

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान 

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान 

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 21, 2026
0

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान  सांगोला /प्रतिनिधी  सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष,...

*मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव*

*मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव*

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 17, 2026
0

  *मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव* *चावीमनला पकडून ठेवत बळजबरीने पाणी सोडल्याचा आरोप** सांगोला : प्रतिनिधी शहरातील मस्के कॉलनी परिसरात...

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 15, 2026
0

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन; मानवतेच्या सेवेचे २३ वे वर्ष सांगोला (प्रतिनिधी): सांगोले...

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपट देशमुख यांचे दुःखद निधन

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपट देशमुख यांचे दुःखद निधन

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 12, 2026
0

सांगोला  :प्रतिनिधी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील तथा विक्रमवीर आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र...

Load More

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697