Sunday, March 1, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

डॉ.शीतल अजळकर सांगोला-पंढरपूर परिसरात नवजात अतिदक्षता सेवा लवकरच सुरू करणार

ग्रामीण मातांसाठी आशेचा नवा किरण; ग्रामीण महाराष्ट्रात नवजात अतिदक्षता सेवेला नवे बळ

संपादक by संपादक
February 24, 2026
in sangola, solapur
0

सांगोला/प्रतिनिधी ः

महानगरांमध्ये उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध असतानाही सामाजिक बांधिलकी जपण्याच्या भावनेतून ग्रामीण भागातील मातांसाठी आणि नवजात बाळांसाठी सेवा देण्याचा धाडसी व संवेदनशील निर्णय घेत डॉ. शीतल सौरभ अजळकर (एमबीबीएस, एमडी – बालरोग, डीआरएनबी – नवजात शिशुशास्त्र) या सांगोला व पंढरपूर परिसरात नवजात अतिदक्षता सेवा सुरू करण्यास सज्ज झाल्या असून लवकरच सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, जत, आटपाडी, कवठेमहांकाळ या भागातील गरजु रूग्णांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

डॉ. शीतल अजळकर यांनी डीआरएनबी (नवजात शिशुशास्त्र) ही उच्च तज्ज्ञ पदवी संपादन केली असून त्यांनी या क्षेत्रातील भारतातील अत्यंत प्रतिष्ठित म्हणून नावलौकिक असलेल्या रेनबो चिल्ड्रन्स हॉस्पिटल हैद्राबाद येथे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

डॉ. शीतल या सांगोला येथील सुप्रसिद्ध कै. डॉ. शंकरराव अजळकर यांच्या स्नुषा तसेच डॉ. अजळकर हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध शल्यविशारद डॉ. सौरभ अजळकर यांच्या सुविद्य पत्नी आहेत.

अकाली जन्मलेली बाळे, जन्मतः अत्यल्प वजनाची (1 किलोपेक्षा कमी वजनाची) बाळे तसेच जन्मानंतर त्काळ किंवा नंतर उद्भवणार्या गुंतागुंतीच्या व गंभीर आजारांचे अत्याधुनिक व तज्ज्ञ व्यवस्थापन करण्याचा त्यांना विशेष अनुभव आहे. त्याचा फायदा ग्रामीण भागातील रूग्णांना होणार आहे.

नवजात संसर्ग, श्‍वसनाचा त्रास, कावीळ, जन्मावेळी मेंदूला ऑक्सिजनचा अभाव (बर्थ अ‍ॅस्फिक्सिया), नवजात बालकांतील फुफ्फुसांतील उच्च रक्तदाब (पीपीएचएन), जन्मजात चयापचय विकार, जन्मजात व आनुवंशिक आजार, मेंदू, हृदय, मूत्रपिंड व पचनसंस्थेचे गंभीर विकार तसेच स्तनपान किंवा आहाराशी संबंधित अडचणी – अशा प्रत्येक नवजात जीवासाठी संपूर्ण व प्रगत सेवा उपलब्ध करून देण्यात डॉ.शीतल अजळकर निष्णात आहेत.

उच्च वारंवारतेचा व्हेंटिलेटर (एचएफओव्ही), श्‍वसनासाठी नायट्रिक ऑक्साइड वायू उपचार, जन्मावेळी ऑक्सिजनअभावी झालेल्या मेंदूविकारासाठी नियंत्रित शीतोपचार पद्धती तसेच उच्च जोखमीच्या नवजात बालकांचे विशेष रुग्णवाहिकेद्वारे व हवाई मार्गाने सुरक्षित स्थलांतर या क्षेत्रातही त्यांना व्यापक अनुभव आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्णांना दिलासा मिळणार आहे.

आजवर अशा प्रकारच्या उपचारांसाठी पालकांना पुणे-मुंबईसारख्या महानगरांकडे धाव घ्यावी लागत होती; मात्र आता महानगरस्तरीय नवजात अतिदक्षता सेवा सांगोला-पंढरपूर परिसरातच उपलब्ध होणार असल्याने सोलापूर जिल्ह्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भातील त्यांच्या पुढील नियोजनाचा अधिक तपशील लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. प्रत्येक नवजात जीव म्हणजे एक विश्‍व आणि त्या विश्‍वाच्या सुरक्षेसाठी तज्ज्ञ हात आता आपल्या जवळ आहेत. अशी ही डॉक्टर शितल अजळकर यांनी सांगितले

Previous Post

धनश्री पवारच्या जिद्दीला सलाम वडिलांचे प्रेत घरात असताना दिला दहावीचा पेपर

Next Post

शाश्‍वत व आरोग्यदायी शेती काळाची गरज : तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव

संपादक

संपादक

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post

शाश्‍वत व आरोग्यदायी शेती काळाची गरज : तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697