Saturday, April 18, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

सां.ता.शि.प्र.मंडळ व सांगोला विद्यामंदिरचा ७४ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
March 4, 2026
in sangola
0
सां.ता.शि.प्र.मंडळ व सांगोला विद्यामंदिरचा ७४ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

 

 

सांगोला ( प्रतिनिधी )

शिक्षणमहर्षी गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी ३ मार्च १९५२ रोजी स्थापन केलेल्या सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला व सांगोला विद्यामंदिर प्रशालेने आपल्या दैदीप्यमान प्रवासाची ७४ वर्षे पूर्ण केली असून ३ मार्च २०२६ रोजी अमृत महोत्सवी वर्षात दिमाखात पदार्पण केले. या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून शाळेच्या पहिल्या बॅचचे ज्येष्ठ विद्यार्थी गोविंद गवळी व तुकाराम गुळमिरे यांचे हस्ते ध्वजारोहण व संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संस्था अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष ॲड विजयसिंह चव्हाण,सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत,संस्था सदस्य चंद्रशेखर अंकलगी,दिगंबर जगताप, प्रफुल्लचंद्र झपके,मंगलप्रभा कोरी, संस्था कार्यकारिणी सदस्य शीलाकाकी झपके, विश्वेश झपके,विद्यामंदिर परिवारातील सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,सांगोला,नाझरा,कोळा विद्यामंदिरचे प्राचार्य, उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य,पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविकातून प्रा.धनाजी चव्हाण यांनी 3 मार्च १९५२ हा दिवस सांगोला तालुक्याच्या शैक्षणिक इतिहासातील सुवर्णक्षण आहे असे सांगत पूज्य गुरूवर्य बापूसाहेबांनी श्रमदान करून मातीच्या विटा पाडण्याचे काम हाती घेऊन श्रमसंस्कारातून विद्यामंदिरच्या रूपाने सृजनशील जीवनाची प्रयोगशाळा उभी केली असे सांगत विद्यमान अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके,सर्व संस्था पदाधिकारी यांचे विधायक व्यवस्थापन व त्याला प्रशासकीय अधिकारी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांची मिळालेली साथ यातून विद्यामंदिर परिवाराची झालेली चौफेर प्रगती सांगितली.व संस्थापक अध्यक्ष कै.बापूसाहेब झपके व माजी अध्यक्षा कै.बाईसाहेब झपके यांचे अमोघ कार्य व विचार प्रमाण मानत त्याच्या कृतज्ञतापूर्वक स्मरणातून यापुढेही प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या स्वप्नातील देव विद्यामंदिरच्या रुपाने आदर्श पालक, प्रेमळ व गुणवत्तेचा आग्रह धरणारे शिक्षक आणि उत्तम शाळा म्हणून वेळोवेळी भेटेल असा आशावाद व्यक्त केला
.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे यांनी केले.

शाळेच्या पहिल्या बॅचचे ज्येष्ठ विद्यार्थी यांचे हस्ते ध्वजारोहण
७४ वर्षांपूर्वी स्वतः श्रमदान करत मातीच्या विटा बनवत सांगोला विद्यामंदिरचा पाया रचत तालुक्याच्या मातीत शिक्षणाचे बीज पेरणारे पूज्य गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास ७४ वर्षापूर्वी ज्यांनी त्यांच्या समोर बसून अक्षरे गिरविली, श्रमसंस्कारातून श्रमदान करत शाळेच्या उभारणीस हातभार लावला .ते शाळेच्या पहिल्या बॅचचे ज्येष्ठ विद्यार्थी गोविंद गवळी, तुकाराम गुळमिरे यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने या ज्येष्ठ विद्यार्थ्यांचा संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तुकाराम गुळमिरे यांनी कृतज्ञता म्हणून ७५११ रुपये संस्थेला देणगी दिली.

 

 

 

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Tags: sangola vidyamandir
Previous Post

७४ वा वर्धापन दिन : संघर्षातून उभारलेले ज्ञानमंदिर

Next Post

वाळू माफियांची मुजोरी वाढली तहसिलदारांच्या गाडीवर दगडफेक ” गाडीच्या फोडल्या काचा

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post
वाळू माफियांची मुजोरी वाढली तहसिलदारांच्या गाडीवर दगडफेक ” गाडीच्या फोडल्या काचा

वाळू माफियांची मुजोरी वाढली तहसिलदारांच्या गाडीवर दगडफेक " गाडीच्या फोडल्या काचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697