Tuesday, October 27, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

अचानक नाकाबंदी करून वाहतूक नियमभंगावर धडक कारवाई

पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचा दबंग अंदाज

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
March 8, 2026
in sangola
0
अचानक नाकाबंदी करून वाहतूक नियमभंगावर धडक कारवाई

अचानक नाकाबंदी करून वाहतूक नियमभंगावर धडक कारवाई; पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचा दबंग अंदाज

सांगोला / प्रतिनिधी

सांगोला शहरातील वाढत्या वाहतूक नियमभंगाच्या घटनांना आळा घालण्यासाठी सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दि. ३ मार्च रोजी अचानक नाकाबंदी करून मोठ्या प्रमाणात धडक कारवाई करण्यात आली. शहरातील वासूद चौक परिसरात ही विशेष मोहीम राबविण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली.

या कारवाईदरम्यान दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणारे, चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्ट न लावणारे चालक, तसेच नंबर प्लेट नसलेली किंवा नियमबाह्य नंबर प्लेट लावलेली वाहने आढळून आल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक वाहनचालकांना पोलिसांनी थांबवून त्यांची तपासणी केली.

याशिवाय मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांवरही विशेष लक्ष ठेवण्यात आले. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. यामुळे रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे दिसून आले.

सांगोला शहरात काही वाहनचालकांकडून मोठ्या आवाजाचे बुलेट मोटारसायकल सायलेन्सर वापरले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार येत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत नियमबाह्य व मोठ्या आवाजाचे बुलेटचे सायलेन्सर काढून घेण्याची कारवाई केली. तसेच मोठ्या आवाजाने नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

तसेच शहरातील रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे अनधिकृत बोर्ड व फलक हटविण्याची कारवाई करण्यात आली. अचानक करण्यात आलेल्या या नाकाबंदीमुळे वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून अनेकांनी नियमांचे पालन करण्याची गरज असल्याची जाणीव व्यक्त केली.

पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगितले की, शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे सर्व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या धडक कारवाईमुळे सांगोला शहरात वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून नागरिकांकडूनही पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.

 

 

 

 

 

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

७ हजारांची लाच घेताना संगेवाडी मंडल अधिकारी व चालक एसीबीच्या जाळ्यात!

Next Post

रंगपंचमी शांततेत साजरी करा; गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई – पोलीस निरीक्षक विनोद घुगे

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post
रंगपंचमी शांततेत साजरी करा; गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई – पोलीस निरीक्षक विनोद घुगे

रंगपंचमी शांततेत साजरी करा; गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई – पोलीस निरीक्षक विनोद घुगे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
September 29, 2026
0

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न बहिर्जी नाईक समाधीस्थळ व शुक्राचार्य देवस्थान दर्शन; ऐतिहासिक, धार्मिक...

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा – मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा – मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा - मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपा सोलापूर ग्रामीणच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान 2026...

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख महोत्सवात भव्य नोकरी भरती मेळाव्याचे...

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान*

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान*

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान* सांगोला (प्रतिनिधी) रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समजून २३ मे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक...

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 22, 2026
0

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल     सांगोला/प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील तहसील कार्यालयात शासकीय कामकाजात अडथळा...

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान 

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान 

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 21, 2026
0

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान  सांगोला /प्रतिनिधी  सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष,...

*मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव*

*मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव*

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 17, 2026
0

  *मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव* *चावीमनला पकडून ठेवत बळजबरीने पाणी सोडल्याचा आरोप** सांगोला : प्रतिनिधी शहरातील मस्के कॉलनी परिसरात...

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 15, 2026
0

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन; मानवतेच्या सेवेचे २३ वे वर्ष सांगोला (प्रतिनिधी): सांगोले...

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपट देशमुख यांचे दुःखद निधन

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपट देशमुख यांचे दुःखद निधन

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 12, 2026
0

सांगोला  :प्रतिनिधी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील तथा विक्रमवीर आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र...

Load More

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697