Saturday, April 18, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

रंगपंचमी शांततेत साजरी करा; गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई – पोलीस निरीक्षक विनोद घुगे

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
March 8, 2026
in sangola
0
रंगपंचमी शांततेत साजरी करा; गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई – पोलीस निरीक्षक विनोद घुगे

रंगपंचमी शांततेत साजरी करा; गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई – पोलीस निरीक्षक विनोद घुगे

 

 

सांगोला / प्रतिनिधी:

रंगपंचमीचा सण उत्साहात आणि आनंदात साजरा करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे सर्वांची जबाबदारी आहे. सणाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार, दंगा किंवा इतरांना त्रास देणारे प्रकार होऊ नयेत, असे आवाहन सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी नागरिक व विशेषतः तरुणांना केले आहे.

रंगपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी तरुणांकडून जबरदस्तीने रंग लावणे, रस्त्यावर अडवून त्रास देणे, वाहनचालकांना अडथळा निर्माण करणे किंवा धिंगाणा घालणे असे प्रकार घडण्याची शक्यता असते. असे प्रकार घडू नयेत यासाठी सांगोला पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असून शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

महिलांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय किंवा छेडछाड होऊ नये यासाठी पोलीस विशेष लक्ष ठेवणार आहेत. तसेच इतर धर्मीयांच्या भावना दुखावतील, सामाजिक सलोखा बिघडेल किंवा वाद निर्माण होतील असे कोणतेही कृत्य करू नये, असेही पोलीस निरीक्षक घुगे यांनी स्पष्ट केले.

रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या चौकात व संवेदनशील भागात पोलीसांचे विशेष पेट्रोलिंग करण्यात येणार असून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. कुठेही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे.

नागरिकांनी सणाचा आनंद घेताना संयम राखावा, जबरदस्तीने कोणालाही रंग लावू नये, मद्यप्राशन करून रस्त्यावर धिंगाणा घालू नये तसेच वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले आहे.

रंगपंचमीचा सण शांततेत, सुरक्षिततेत आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करून सांगोला तालुक्याची परंपरा कायम ठेवावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

अचानक नाकाबंदी करून वाहतूक नियमभंगावर धडक कारवाई

Next Post

सांगोल्यात मटका जुगारावर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल, रोख रक्कम जप्त

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post
सांगोल्यात मटका जुगारावर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल, रोख रक्कम जप्त

सांगोल्यात मटका जुगारावर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल, रोख रक्कम जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697