*नगराध्यक्ष आनंद माने यांच्या हस्ते ‘समर्थ नगर’ नामफलकाचे उत्साहात अनावरण*
सांगोला (प्रतिनिधी):
सांगोला शहरातील जुन्या मेडशिंगी रोडवरील स्पंदन आय.सी.यू. हॉस्पिटल नजीक असलेल्या समर्थ नगर परिसरात भव्य नामफलकाचे अनावरण नगराध्यक्ष आनंद माने यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. या फलकामुळे परिसरातील रहिवाशांची आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांची ओळख पटवण्याची सोय झाली असून, समर्थ नगरला आता स्वतंत्र ओळख प्राप्त झाली आहे.
या अनावरण सोहळ्याप्रसंगी प्रभाग क्रमांक ३ ‘अ’ च्या नगरसेविका गोदाबाई बनसोडे आणि प्रभाग क्रमांक ३ ‘ब’ चे नगरसेवक अरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभागातील प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांच्या संदर्भात नगराध्यक्षांनी यावेळी रहिवाशांशी संवाद साधला.
या कार्यक्रमाला समर्थ नगर परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये विलास पाटील सर, प्रा. राजेंद्र ठोंबरे, संजय खिस्ते, सुभाष दिघे सर, हरिबा घोडके सर, देवदत्त केदार सर, योगेश कुलकर्णी, दत्तात्रय घाडगे, मनोहर राऊत, सागावकर तसेच परिसरातील इतर नागरिक आणि युवक उपस्थित होते. समर्थ नगरच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले. या उपक्रमाबद्दल नगराध्यक्ष व नगरसेवकांचे परिसरातून कौतुक होत आहे.

