Tuesday, October 27, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

कार्यकर्त्यांनी खचून न जाता जोमाने कामाला लागावे ; दिपकआबा साळुंखे पाटील यांचा निर्धार

पुढील भविष्याबाबत कार्यकर्त्यांना अपेक्षित निर्णय घेणार

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
March 8, 2026
in political
0
कार्यकर्त्यांनी खचून न जाता जोमाने कामाला लागावे ; दिपकआबा साळुंखे पाटील यांचा निर्धार

कार्यकर्त्यांनी खचून न जाता जोमाने कामाला लागावे ; दिपकआबा साळुंखे पाटील यांचा निर्धार

पुढील भविष्याबाबत कार्यकर्त्यांना अपेक्षित निर्णय घेणार

सांगोला/प्रतिनिधी 

आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात स्थानिक स्वराज्य संस्थेत नेहमीच आपले वर्चस्व राहिले होते मात्र नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आपण कमी पडलो झालेल्या पराभवाचे शल्य बाजूला ठेऊन आणि झालेल्या चुका टाळून आगामी ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. यापुढील काळात कार्यकर्त्यांना अपेक्षित आहे तोच निर्णय आपण घेऊ असा निर्धार माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केला.

रविवार दि. 8 मार्च रोजी सांगोला येथे पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील, शिवाजीनाना बनकर, मधुकर बनसोडे, जिल्हा दूध संघाचे संचालक विजय येलपले, चंद्रकांत चौगुले, तुकाराम जाधव, विजय पवार, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, सुनील पाटील, अ‍ॅड. यशराजे साळुंखे पाटील, डॉ. पियुष साळुंखे पाटील, समीर पाटील आदींसह आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी पंचायत समिती सभापती उपसभापती निवडीच्या पार्श्‍वभूमीवर या बैठकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. अचानक बैठकीचे नियोजन करूनही या बैठकीला सांगोला शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

पुढे बोलताना माजी आमदार दिपकआबा म्हणाले, गेली 60 हून अधिक वर्षे साळुंखे पाटील कुटुंब हे सांगोला तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहे. या काळात तालुक्यातील कार्यकर्त्यांनी नेहमीच सुख आणि दुःखात कार्यकर्त्यांनी आमच्यावर कुटुंबातील सदस्याप्रमाणे विश्‍वास ठेवला याच विश्‍वासावर यापुढील काळात कार्यकर्त्यांच्या जोरावर त्यांना अपेक्षित असणारा निर्णय घेण्यात येईल त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला आपण तयार आहोत. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जरी आमचे उमेदवार कमी पडले असले तरी, आजही तालुक्यातील सर्वसामान्य लोकांचा विश्‍वास हा साळुंखे पाटील परिवारावर आहे. याच विश्‍वासाच्या बळावर आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला पराभव बाजूला ठेऊन आपल्याला पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागावे असे आवाहन यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.

या बैठकीत मनोज उकळे, लहू कांबळे, अमर लोखंडे, विजय शिंदे, संतोष पाटील, विलास घुले, संभाजी हरिहर, अजित देवकते, सखुबाई वाघमारे, नारायण माळी, अजिंक्य शिंदे, दिपक कांबळे आदी नेते आणि कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आगामी काळात माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सत्ताधारी राजकीय पक्षात प्रवेश करून दीर्घकालीन राजकारण डोळ्यासमोर ठेवून कठोर निर्णय घ्यावे अशी भूमिका मांडली

 

आजपर्यंतच्या 30 ते 35 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत नेहमीच पक्ष पार्टी जात धर्म न पाहता कुणाच्याही शिफारशीची वाट न पाहता लोकांची कामे करत गेलो. तरीही, कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही याबाबत आत्मपरीक्षण करून आगामी काळात कामाची पद्धतीत बदल करू ; 

दिपकआबा साळुंखे पाटील

 

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Tags: दिपक आबा साळुंखे पाटील
Previous Post

प्रत्येक अपयश एक नवीन शिकवण देऊन जाते- तहसीलदार बाळुताई भागवत

Next Post

नगराध्यक्ष आनंद माने यांच्या हस्ते ‘समर्थ नगर’ नामफलकाचे उत्साहात अनावरण

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post
नगराध्यक्ष आनंद माने यांच्या हस्ते ‘समर्थ नगर’ नामफलकाचे उत्साहात अनावरण

नगराध्यक्ष आनंद माने यांच्या हस्ते 'समर्थ नगर' नामफलकाचे उत्साहात अनावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
September 29, 2026
0

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न बहिर्जी नाईक समाधीस्थळ व शुक्राचार्य देवस्थान दर्शन; ऐतिहासिक, धार्मिक...

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा – मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा – मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा - मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपा सोलापूर ग्रामीणच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान 2026...

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख महोत्सवात भव्य नोकरी भरती मेळाव्याचे...

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान*

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान*

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान* सांगोला (प्रतिनिधी) रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समजून २३ मे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक...

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 22, 2026
0

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल     सांगोला/प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील तहसील कार्यालयात शासकीय कामकाजात अडथळा...

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान 

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान 

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 21, 2026
0

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान  सांगोला /प्रतिनिधी  सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष,...

*मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव*

*मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव*

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 17, 2026
0

  *मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव* *चावीमनला पकडून ठेवत बळजबरीने पाणी सोडल्याचा आरोप** सांगोला : प्रतिनिधी शहरातील मस्के कॉलनी परिसरात...

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 15, 2026
0

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन; मानवतेच्या सेवेचे २३ वे वर्ष सांगोला (प्रतिनिधी): सांगोले...

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपट देशमुख यांचे दुःखद निधन

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपट देशमुख यांचे दुःखद निधन

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 12, 2026
0

सांगोला  :प्रतिनिधी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील तथा विक्रमवीर आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र...

Load More

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697