Saturday, April 18, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

प्रत्येक अपयश एक नवीन शिकवण देऊन जाते- तहसीलदार बाळुताई भागवत

फॅबटेक मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात संपन्न

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
March 8, 2026
in sangola
0
प्रत्येक अपयश एक नवीन शिकवण देऊन जाते- तहसीलदार बाळुताई भागवत

प्रत्येक अपयश एक नवीन शिकवण देऊन जाते- तहसीलदार बाळुताई भागवत

फॅबटेक मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात संपन्न

सांगोला: प्रतिनिधी

 

आपल्या आयुष्यातील पहिला गुरू आई असते. अपयश ही प्रगतीची पहिली पायरी असून, इतिहासातील अनेक महान व्यक्तींनी अपयशातूनच धडा घेऊन मोठे यश मिळवले आहे. आयुष्यात खुप काही करण्यासारखे आहे. आपला देश जगात खुप बलाढ्य आहे. प्रत्येकांनी आयुष्यात एक उमेद घेऊन जीवन जगले पाहिजे. स्वतःच्या करिअर कडे लक्ष दिले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला टेन्शन असते. आयुष्यात पराभव झाला म्हणून खचून जायचे नाही. आपल्या आयुष्यातील अपयश अन् यश या दोन्ही मध्ये जे भेटते तो इतिहास असतो. तुमचे कष्ट प्रामाणिक असले की अपयश सुध्दा एक नवीन शिकवण देऊन जात असल्याचे प्रतिपादन तहसीलदार बाळूताई भागवत यांनी फॅबटेक मधील वार्षिक स्नेहसंमेलन बोलताना व्यक्त केले.

फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयात शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती, स्व. गणपतराव देशमुख, स्व. बिरासाहेब रूपनर आदी प्रतिमापूजन तहसीलदार बाळूताई भागवत, नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे, संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सुरेखा रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर, नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य तानाजी बुरूंगले, स्कूलचे प्राचार्य सिकंदर पाटील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दरम्यान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.

ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाचे बीज रुजविण्याचे काम फॅबटेक टेक्निकल कॅम्पस करीत आहे. सांगोला सारख्या ठिकाणी आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी फॅबटेक संस्था उभी करून विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षण आज फॅबटेक संस्था देत आहे. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच सांस्कृतिक, क्रीडा व इतर सहशालेय उपक्रमांमध्येही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम फॅबटेक संस्था करीत आहे.

प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांशी सुसंवाद ठेवत विश्‍वासाचे नाते निर्माण करण्यात फॅबटेक संस्था देखील यशस्वी ठरली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्यातील आत्मविश्‍वास वाढवण्यासाठी, संस्कृती आणि परंपरा जतन करण्यासाठी व त्याचबरोबर शैक्षणिक वर्षातील यशाचा आनंद साजरा करण्यासाठी फॅबटेक कॉलेजेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दरवर्षी आयोजित करत असते.

विद्यार्थ्यांच्या प्रत्येक क्षमतेला व्यासपीठ मिळावे, त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण व्हावा आणि कला-संस्कारांची ज्योत सतत पेटत राहावी, या हेतूने नक्षत्र 2के26 कार्यक्रम आयोजित केला जातो.

यामध्ये ट्रॅडीशनल डे, फिशपॉड कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. याशिवाय ग्रुप डान्स, गायन, कला सादरीकरण, लावणी, नाटक, देवीचा जागर गीत, छञपती शिवाजी महाराज यांची आरती आदींसह अनेक कला विद्यार्थ्यांनी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख राहूल पाटील, स्टुडंट डिन डॉ. संजय पवार, अकॅडमिक डिन डॉ. अनुप विभुते, विद्यार्थिनीनी कुमारी कुमुद भडकवाड आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. प्रियांका पावसकर व प्रा. जयश्री मदने यांनी केले.

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

माण नदीकाठी तिरट जुगारावर पोलिसांची धाड; सहा जण ताब्यात, रोख रक्कम जप्त

Next Post

कार्यकर्त्यांनी खचून न जाता जोमाने कामाला लागावे ; दिपकआबा साळुंखे पाटील यांचा निर्धार

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post
कार्यकर्त्यांनी खचून न जाता जोमाने कामाला लागावे ; दिपकआबा साळुंखे पाटील यांचा निर्धार

कार्यकर्त्यांनी खचून न जाता जोमाने कामाला लागावे ; दिपकआबा साळुंखे पाटील यांचा निर्धार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697