Saturday, April 18, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

सांगोला नगर परिषदेमार्फत होम मिनिस्टर व विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न

पैठणीच्या मानकरी ठरल्या नेहा कावळे, पूजा बागडे , ज्योती गोडसे

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
March 10, 2026
in sangola
0
सांगोला नगर परिषदेमार्फत होम मिनिस्टर व विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न

*सांगोला नगर परिषदेमार्फत होम मिनिस्टर व विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*पैठणीच्या मानकरी ठरल्या नेहा कावळे, पूजा बागडे , ज्योती गोडसे*

सांगोला नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक 7व 9 मार्च 2026 रोजी विविध स्पर्धा व होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
•दिनांक 7 मार्च रोजी पाककला व ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाक कला स्पर्धेत करिता प्रत्येकी र. रुपये 5 हजार 1, 3 हजार 1, व 2 हजार 1 अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांकाकरिता ठेवण्यात आले होते. ग्रुप डान्स स्पर्धेत करिता प्रत्येकी र. रुपये 7 हजार 1, 5 हजार 1, व 3 हजार 1 अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांका करिता ठेवण्यात आले होते. त्याप्रमाणे पाक कला स्पर्धेमध्ये अफरीन पठाण, मनीषा हुंडेकरी, नीता लाटणे ,राजाबाई मस्के व ग्रुप डान्स स्पर्धेमध्ये युवा ग्रुप,सखी ग्रुप, धुरंदर ग्रुप, चौंडेश्वरी ग्रुप हे अनुक्रमे प्रथम द्वितीय ,तृतीय ,उत्तेजनार्थ बक्षीसाचे मानकरी ठरले.
•दिनांक 9 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली होम मिनिस्टर तसेच बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन सांगोला येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ छायाताई मेटकरी , डॉ.सौ. निकिताताई बाबासाहेब देशमुख, सौ.अपेक्षाताई पाटील, पंचायत समिती सदस्या सौ.राणीताई पाटील, सौ.वंदना शेळके, सांगोला शहराच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ.सौ.नेहा साळुंखे पाटील, डॉ.सौ. मेघना देवकाते , तालुका कृषी अधिकारी सौ.दिपाली जाधव मॅडम तसेच सांगोला नगरपरिषदेच्या सन्माननीय सदस्या, कर्तव्यदक्ष शहर संघाच्या अध्यक्षा सौ. सुनंदाताई घोंगडे व माजी नगरसेविका पूजाताई पाटील इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रस्ताविक प्रसंगी बोलताना माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका राणीताई माने यांनी कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली. तसेच या कार्यक्रमा वेळी मनोगत व्यक्त करताना सौ.निकिताताई देशमुख यांनी ‘महिलांनी स्वतःच्या आरोग्याबाबत नेहमीच तत्पर असले पाहिजे’ असे सांगितले. त्यांनतर अपेक्षा ताई पाटील यांनी ‘प्रत्येक दिवस महिलांनी स्वतःसाठी जगायला हवा’ असा सल्ला दिला.तसेच स्त्री रोग तज्ञ डॉक्टर नेहा साळुंखे-पाटील यांनी महिलांनी आपण स्वतःसाठी काय करू शकतो यासाठी प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ छायाताई मेटकरी यांनी ‘सांगोला नगरपरिषद महिलांसाठी नावीन्यपूर्ण कार्यक्रम राबवत असते आणि इथून पुढे हे राबवले जातील’ असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात केले.

सदर कार्यक्रमात आयोजित केलेल्या बक्षीस वितरण समारंभात सांगोला शहरातील साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कवयित्री पुष्पाताई मिसाळ ,मनीषा ठोंबरे, अर्चना देसाई, सुवर्णा तेली, हर्षदा गुळमिरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच प्रशासनातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सायली पाटील यांचाही सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.यावेळी होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवून विविध खेळांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला यावेळी पाककला स्पर्धेसाठी लाभलेले परीक्षक तनुजा गवळी, छाया यादव, राजश्री महिमकर व डान्स स्पर्धेसाठी लाभलेले परीक्षक मृणाल राऊत, शुभांगी पतंगे व सावित्रा कस्तुरे यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अनुपमाताई गुळमिरे यांनी केले.स्पर्धेचे विजेते व सहभागी या सर्वांना बक्षीस वितरण समारंभाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी नगरपरिषदेचे कर अधिकारी प्रियांका पाटील, अस्मिता निकम व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

 

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

सांगोला पोलीस ठाण्यात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

Next Post

अबब..! सांगोला विद्यामंदिरचे तब्बल 173 विद्यार्थी NMMS परीक्षेत पात्र

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post
अबब..! सांगोला विद्यामंदिरचे तब्बल 173 विद्यार्थी NMMS परीक्षेत पात्र

अबब..! सांगोला विद्यामंदिरचे तब्बल 173 विद्यार्थी NMMS परीक्षेत पात्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697