Saturday, April 18, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

अबब..! सांगोला विद्यामंदिरचे तब्बल 173 विद्यार्थी NMMS परीक्षेत पात्र

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
March 12, 2026
in sangola
0
अबब..! सांगोला विद्यामंदिरचे तब्बल 173 विद्यार्थी NMMS परीक्षेत पात्र

*अबब..! सांगोला विद्यामंदिरचे तब्बल 173 विद्यार्थी NMMS परीक्षेत पात्र*

सांगोला / प्रतिनिधी

शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस. या परीक्षेत सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश प्राप्त करत यशाची परंपरा राखली.
या परीक्षेत प्रविष्ट एकूण विद्यार्थी 202 पैकी 173 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 150 पेक्षा अधिक गुण मिळवणारे 03 विद्यार्थी, 140 पेक्षा अधिक गुण मिळवणारे 18 विद्यार्थी, 130 पेक्षा अधिक गुण मिळवणारे 35 विद्यार्थी, 120 पेक्षा अधिक गुण मिळवणारे 63 विद्यार्थी, 110 पेक्षा अधिक गुण मिळवणारे 99 विद्यार्थी, तर 100 पेक्षा अधिक गुण मिळवणारे 128 विद्यार्थी आहेत.
कुमारी सुबोधिनी गुंडोपंत इंगवले हिने 156 गुण मिळवून प्रशालेमध्ये प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळवला.
सदर विद्यार्थ्यांना NMMS विभागातील सर्व शिक्षकांसह विभाग प्रमुख निलेश जंगम, संस्था बाह्यपरीक्षा विभागप्रमुख नामदेव खंडागळे, प्रशाला बाह्यपरीक्षा विभागप्रमुख सिताराम राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.
या उज्वल यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांसह पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष आदरणीय प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, संस्था उपाध्यक्ष ॲड.विजयसिंह चव्हाण, संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, कार्यकारिणी सदस्य शीलाकाकी झपके, विश्वेशजी झपके, सर्व संस्था सदस्य,प्राचार्य अमोल गायकवाड, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, विभागनियंत्रक व पर्यवेक्षक प्रदिप धुकटे, उत्तम सरगर, काकासाहेब नरुटे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सदर परीक्षेची शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची यादी लवकरच प्रसिद्ध होणार असून सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या परंपरेप्रमाणे प्रतिवर्षी विद्यार्थी NMMS परीक्षेमधून जवळपास 50 लाखांच्या आसपास शासकीय शिष्यवृत्ती संपादन करत असतात.

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Tags: विद्यामंदिर परिवार
Previous Post

सांगोला नगर परिषदेमार्फत होम मिनिस्टर व विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न

Next Post

*जिद्द, कष्टाची कास आणि समाजसेवेचे व्रत — दादासाहेब*

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post
*जिद्द, कष्टाची कास आणि समाजसेवेचे व्रत — दादासाहेब*

*जिद्द, कष्टाची कास आणि समाजसेवेचे व्रत --- दादासाहेब*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697