Tuesday, October 27, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

जवळा गाव आणि परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी साळुंखे पाटील कुटुंबिय कधीही मागे हटणार नाही : मा.आम.दिपकआबा साळुंखे पाटील

कार्यतपस्वी आमदार कै. काकासाहेब साळुंखे पाटील बहुउद्देशीय भवन या नवीन वस्तूचा उद्घाटन समारंभ संपन्न 

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
February 24, 2026
in sangola, solapur
0

कार्यतपस्वी आमदार कै. काकासाहेब साळुंखे पाटील बहुउद्देशीय भवन या नवीन वस्तूचा उद्घाटन समारंभ संपन्न 

सांगोला/प्रतिनिधी ः

 

राजकारणात जय – पराजय होत असतात, एखाद्या पराजयाला खचून जाणारे साळुंखे कुटुंबीय नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे शत्रू किती मोठा आहे यापेक्षा आपल्यातील फितूर किती आहेत हे ओळखायला सुरुवात केली आहे. पाठीमागून चर्चा उठवण्यापेक्षा आणि रडीचा डाव न खेळता मैदानात येऊन सामना करावा असे ठणकावून सांगत, जवळा गावच्या आणि चार वाड्याच्या विकासासाठी जेवढं काही करता येईल तेवढं केले जाईल. राजकारणाच्या पलीकडे जाऊन गावच्या विकासाला चालना देण्यासाठी साळुंखे पाटील कुटुंबिय कधीही मागे हटणार नाही असा विश्‍वास माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला.

कार्यतपस्वी आमदार कै. काकासाहेब साळुंखे पाटील बहुउद्देशीय भवन या नवीन वस्तूचा उद्घाटन समारंभ व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी जवळा गावाने घेतलेला ऐतिहासिक निर्णय दीपस्तंभ सारे शिकूया भारताचे दीपस्तंभ होऊया 25 फेब्रुवारी 2026 पासून रात्री 7 ते रात्री 9 पर्यंत जवळा गावातील मोबाईल आणि टीव्ही पूर्णपणे बंद या संकल्पनेचा शुभारंभ काल मंगळवार दिनांक 24 रोजी संपन्न झाला. यावेळी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील बोलत होते.

या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, युवक नेते ड. यशराजे साळुंखे पाटील, भाजपाचे नेते संभाजी तात्या आलदर, सरपंच सज्जन मागाडे, उपसरपंच नवाज खलिफा, अरुणभाऊ घुले सरकार, सुनील आबा साळुंखे पाटील, ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय रसाळ यांच्यासह ग्राम पंचायतीचे आजी-माजी सदस्य, तंटामुक्तीचे पदाधिकारी, पोलीस पाटील, ज्येष्ठ मंडळी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पुढे बोलताना माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील पुढे बोलताना म्हणाले, आत्मपरीक्षण करून पुढे कामाला सुरुवात केली आहे. गावच्या विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, यामध्ये इथून पुढच्या काळात कोणताही कागद आणायसाठी आता सांगोल्याला हेलपाटे मारावी लागणार नाहीत. कारण प्रत्येक कार्यालय आता एका छताखाली सुरू होत आहे. यामधून जवळा आणि जवळच्या वाड्या वस्त्यावरील नागरिकांची निश्‍चितपणाने गैरसोय दूर होणार आहे. एक फूट जागा कोण कोणाला देत नाही अशा परिस्थितीत साळुंखे पाटील कुटुंबीयांनी प्रमुख चौकातील जागा दिली आहे. ही साळुंखे पाटील कुटुंबीयांची दानत आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांचा विकास करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आज शासकीय इमारतीचे उद्घाटन होत असताना मला मनस्वी आनंद आहे. कारण आपल्याच गावातील वयोवृद्ध नागरिक महिला मुलींच्या शाळेची कामे या एकाच ठिकाणी होणार आहेत. कागदासाठी आता सांगोला जाण्याची गरज नाही. ही व्यवस्था होत असताना कार्यतपस्वी आमदार काकासाहेबांचे स्वप्न साकार करण्याचे काम आमच्यातून घडत आहे यातच मोठे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी म्हणाले, सायंकाळी मोबाईल आणि टीव्ही बंद करून जवळा गावाने सोलापूर जिल्ह्यात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याचा आदर्श इतर गावांनी तालुक्यांनी घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले. यासह जवळा गावात एकाच छताखाली सर्व विभाग कार्यरत होणार असल्याने शासकीय योजना राबवताना सोयस्कर होणार आहे. यामध्ये प्रत्येक योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल असा विश्‍वास देखील त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच सज्जन मागाडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी जवळा व पंचक्रोशीतील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अतोनात प्रयत्नांतर शासकीय सर्व विभागीय कार्यालय एकाच छताखाली सुरू होणार आहेत. यामधून शासकीय कामे आपल्याच गावात पूर्ण होणार असून, सर्वसामान्य नागरिकांची शासकीय कामकाजाला गती मिळणार आहे. यामधून निश्‍चित पणाने नागरिकांच्या अडीअडचणी दूर होतील असा विश्‍वास आहे. हे शासकीय कार्यालय आपल्या श्री नारायण मंदिराच्या पावन नगरीत सुरू होत असून हे आपले भाग्य आहे.

अ‍ॅड . यशराजे दीपकआबा साळुंखे पाटील

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

शाश्‍वत व आरोग्यदायी शेती काळाची गरज : तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव

Next Post

सांगोल्यात विकासाचा बिगुल! ५३ कामांना मंजुरी, स्व.आ.भाई गणपतराव देशमुख स्मारकासाठी तब्बल ३ कोटी

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post

सांगोल्यात विकासाचा बिगुल! ५३ कामांना मंजुरी, स्व.आ.भाई गणपतराव देशमुख स्मारकासाठी तब्बल ३ कोटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
September 29, 2026
0

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न बहिर्जी नाईक समाधीस्थळ व शुक्राचार्य देवस्थान दर्शन; ऐतिहासिक, धार्मिक...

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा – मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा – मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा - मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपा सोलापूर ग्रामीणच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान 2026...

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख महोत्सवात भव्य नोकरी भरती मेळाव्याचे...

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान*

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान*

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान* सांगोला (प्रतिनिधी) रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समजून २३ मे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक...

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 22, 2026
0

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल     सांगोला/प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील तहसील कार्यालयात शासकीय कामकाजात अडथळा...

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान 

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान 

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 21, 2026
0

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान  सांगोला /प्रतिनिधी  सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष,...

*मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव*

*मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव*

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 17, 2026
0

  *मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव* *चावीमनला पकडून ठेवत बळजबरीने पाणी सोडल्याचा आरोप** सांगोला : प्रतिनिधी शहरातील मस्के कॉलनी परिसरात...

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 15, 2026
0

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन; मानवतेच्या सेवेचे २३ वे वर्ष सांगोला (प्रतिनिधी): सांगोले...

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपट देशमुख यांचे दुःखद निधन

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपट देशमुख यांचे दुःखद निधन

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 12, 2026
0

सांगोला  :प्रतिनिधी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील तथा विक्रमवीर आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र...

Load More

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697