Saturday, April 18, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

सांगोल्यात सुतगिरणी जवळ दोन गटात हाणामारी;३३ जणावर गुन्हा दाखल! जमिन व्यवहाराचा वाद असल्याची चर्चा

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
April 1, 2026
in sangola
0
सांगोल्यात सुतगिरणी जवळ दोन गटात हाणामारी;३३ जणावर गुन्हा दाखल! जमिन व्यवहाराचा वाद असल्याची चर्चा

सांगोल्यात सुतगिरणी जवळ दोन गटात हाणामारी;३३ जणावर गुन्हा दाखल! जमिन व्यवहाराचा वाद असल्याची चर्चा

 

सांगोला  / प्रतिनिधी

सांगोला येथील शेतकरी महिला सूत गिरणीसमोर मोकळ्या जागेत दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी सांगोला पोलिसांनी तब्बल ३३ जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत सांगोला पोलीस ठाणे येथे बाबासाहेब वसंत पाटील (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींनी गैरकायदेशीर जमाव करून पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत दोन गटांत मारामारी केली. या घटनेत लोखंडी तलवार तसेच लाठ्या-काठ्यांचा वापर करण्यात आला असून सार्वजनिक शांततेचा भंग झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी आरोपी म्हणून सचिन ज्ञानेश्वर हजारे (रा. खर्डी, ता. पंढरपूर), काशिलिंग पांडुरंग गाडेकर (रा. धनगर गल्ली), अतुल विष्णू येडगे (रा. खर्डी), दत्तात्रय नाना झेडगे (रा. बोर्बेवाडी, ता. आटपाडी), गणेश शिवाजी नवले (रा. एकतपूर, ता. सांगोला), सागर दाजी मोरे (रा. धायटी), सुभाष शिवाजी मेटकरी (रा. चांडोलवाडी), दीपक राजाराम वगरे (रा. धनगर गल्ली), विक्रम विलास मेटकरी (रा. गोणेवाडी, ता. मंगळवेढा), सुरज तानाजी मेटकरी (रा. खडकी, ता. मंगळवेढा), दीपक दत्तात्रय मासाळ (रा. गोणेवाडी), अतिक रहमान मुजावर (रा. मुजावर वस्ती), अरमान फारुक शेख (रा. आनंदनगर), बंडू दामू मासाळ (रा. धायटी), शरद रामचंद्र मासाळ (रा. गोणेवाडी), विलास मारुती खांडेकर (रा. गोणेवाडी), पैगंबर गुलाब मुलाणी (रा. संजय नगर झोपडपट्टी), आदिनाथ कल्लाप्पा वारे (रा. नाझरे), सोमनाथ मारुती मंडले (रा. महुद रोड), नागेश बापू मोरे (रा. शिरभावी), बिरा दामू मासाळ (रा. धायटी), अंकुश तुकाराम शेंबडे, वैभव रावसाहेब शेंबडे, सिद्धेश्वर तुकाराम शेंबडे (रा. शेंबडे वस्ती), बाळू भिमा मेटकरी, शिवाजी बापू मेटकरी, तानाजी आनंदा मेटकरी, कुमार आनंदा मेटकरी, उल्हास गोरख मेटकरी, प्रभाकर यशवंत सरगर, रावसाहेब शिवाजी मेटकरी, बाबू बापू मेटकरी, युवराज बाळू मेटकरी (सर्व रा. चांडोलवाडी परिसर) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी संबंधितांना कायदा व सुव्यवस्था बिघडवू नये, असे सांगूनही आरोपींनी आदेश न जुमानता एकमेकांवर हल्ला चढवला. यामध्ये बंडू मासाळ याने हातात लोखंडी तलवार घेतल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या (बीएनएस) विविध कलमांसह शस्त्र अधिनियम कलम ४.२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ/४८४ बनसोडे करीत असून, गुन्ह्याची नोंद पोहेकॉ/१०५४ शिंदे यांनी केली आहे.

दरम्यान सदरील दोन गटात झालेली हाणामारी ही जमिनीच्या व्यवहाराच्या वादातून झाली असल्याची चर्चा सांगोला शहर व तालुक्यात सुरू आहे.पोलिस वेळेवर पोहचल्याने मोठा अनर्थ टळला असून नेमका व कशामुळे वाद झाला असावा? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सध्या नागरिकातून केली जात आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

डीजेवर बंदी, कडक बंदोबस्ताचा इशारा; सांगोल्यात आंबेडकर जयंतीपूर्वी शांतता समिती बैठक संपन्न

Next Post

प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवा; दिखाऊ काम नको, निकाल हवा!

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post
प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवा; दिखाऊ काम नको, निकाल हवा!

प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवा; दिखाऊ काम नको, निकाल हवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697